TRENDING:

Turmeric Polishing : पिवळ्या सोन्यातून पैसा कमवायचा, तर पॉलिशिंग हवंच, हळद काढल्यानंतर काय करतात? पाहा Video

Last Updated:

Turmeric Polishing: चांगल्या बाजारभावासाठी हळकुंडाची जाडी, लांबी, चकाकी पाहिली जाते. शिजवलेली हळद 10 ते 12 दिवस उन्हात वाळवल्यानंतही तिची प्रतवारी, पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: जीआय मानांकन असलेल्या सांगलीच्या हळदीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे. तसेच हळदीची जगप्रसिद्ध बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. हळद पिकातून जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची उलाढाल होते. काढणी केल्यानंतर विक्रीपूर्वी हळदीवर काही प्रक्रिया केल्या जातात. यापैकीच अत्यंत महत्त्वाच्या आणि बाजारभावावर परिणाम करणाऱ्या हळद पॉलिश प्रक्रियेविषयी हळद संशोधक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली.
advertisement

हळदीला चकाकी आणताना प्रक्रिया कशी?

शिजवलेली हळद आधी 10 ते 12 दिवस उन्हामध्ये वाळवावी. सुकवायला टाकलेल्या हळकुंडापैकी वाळलेले हळकुंड निवडावी. ही हळकुंड लोखंडी टॅंकमध्ये टाकून त्यात 5 ते 7 अणकुचीदार दगड घर्षणासाठी टाकले जातात. हळद शिजवताना हळदीवर मातीचा थर बसलेला असतो. त्यामुळे ती काळपट दिसते किंवा चिरते. हा वरचा मातीचा थर पॉलिश केल्यानंतर हळदीला चकाकी येते. यासाठी आधुनिक लोखंडी टॅंक वापरतात.

advertisement

Agriculture: ना खत, ना पाणी, नुसत्या हवेवर पिकतोय गहू, सांगलीतल्या पारंपरिक शेतीचा Ground Report

टँकमध्ये हळद भरून त्याला गोलाकार फिरवले जाते. हा टँक गोलाकार मोटरच्या आधारे फिरवला जातो. हळद पॉलिश करण्याच्या सुधारित यंत्राला तीन प्रकारचे चाळे आहेत. या चाळ्यांमधून एक, दोन व तीन नंबरची हळकुंड वेगळी करून मिळतात. ही प्रक्रिया झाल्यावर हळकुंड पोत्यात भरून त्याचे वजन केले जाते. यानंतर हळद विक्रीसाठी तयार होते.

advertisement

हळदीची प्रतवारी

बाजारात हळद प्रतवारी करण्यासाठी विविध यंत्र उपलब्ध आहेत. या यंत्रांच्या वापरामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते. वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी केल्यानंतर चांगल्या बारदानामध्ये पॅकिंग करावे. यामध्ये सोरेगड्ढे व शिजवलेले गड्ढे हे वेगवेगळ्या ठिकाणी पॅक करावेत. हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात. त्यानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

advertisement

हळद पॉलिश केल्यानंतर हळकुंडाची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करावी.

जाड, लांब हळकुंडे (3 ते 5 सें.मी. लांबी)

मध्यम जाड हळकुंडे (2 ते 3 सें.मी. लांबी)

लहान आकाराची हळकुंडे (2 सें.मी. पेक्षा कमी लांबी) लहान माती व खडेविरहित कणी.

नेहमी लक्षात ठेवा

पॉलिश केलेली हळद माती किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवू नये. हळदीची चकाकी कायम राहिल्यास उत्तम बाजार भाव मिळण्यास मदत होते. तसेच शिजवून वाळवलेली हळद विक्रीसाठी मार्केटला आणण्यापूर्वी दोन-चार दिवस आधी पॉलिश करावी. फार आधी पॉलिश केलेल्या हळदीची चकाकी कमी होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पिवळ्या सोन्यातून पैसा कमवायचा, तर पॉलिशिंग हवंच, हळद काढल्यावर काय करतात? पाहा
सर्व पहा

सध्या हळदीला चांगला भाव मिळत असून अनेक भागात हळदीला पॉलिश करण्याची प्रक्रिया सुरु आहे. चांगल्या बाजारभावासाठी हळकुंडाची जाडी, लांबी, चकाकी पाहिली जाते. शिजवलेली हळद 10 ते 12 दिवस उन्हात वाळवल्यानंतरही तिची प्रतवारी, पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते, असे हळद संशोधक प्रतापसिंह मोहिते-पाटील सांगतात.

मराठी बातम्या/कृषी/
Turmeric Polishing : पिवळ्या सोन्यातून पैसा कमवायचा, तर पॉलिशिंग हवंच, हळद काढल्यानंतर काय करतात? पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल