TRENDING:

PSL 2026 : शेवटच्या ओव्हरला मोठा ड्रामा, तीन बॉलमध्ये मॅच कशी फिरली? डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात टीमचा विजय

Last Updated:

खरं तर क्वेटा ग्लेडिएटर्स हा सामना सहज जिंकून शकली असती. कारण त्यांना 12 बॉलमध्ये फक्त 35 धावांची गरज होती. पण शेवटच्या ओव्हरला तीन बॉलने अख्खी मॅच फिरवली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PSL 2026, Quetta Gladiators vs Karachi Kings : पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात कराची किंगने अवघ्या 14 धावांनी क्वेटा ग्लेडिएटर्सचा पराभव केला आहे. खरं तर क्वेटा ग्लेडिएटर्स हा सामना सहज जिंकून शकली असती. कारण त्यांना 12 बॉलमध्ये फक्त 35 धावांची गरज होती. पण शेवटच्या ओव्हरला तीन बॉलने अख्खी मॅच फिरवली होती.त्यामुळे नेमकं सामन्यात काय घडलं? हे जाणून घेऊयात.
Quetta Gladiators vs Karachi Kings
Quetta Gladiators vs Karachi Kings
advertisement

खरं तर या सामन्यात क्वेटा ग्लेडिएटर्सला 12 बॉलमध्ये फक्त 35 धावांची गरज होती. ज्यावेळेस त्यांना इतक्या धावा करायच्या होत्या त्यावेळेस त्याच्या 4 विकेटच पडल्या होत्या.त्यामुळे क्वेटा सामना जिंकेल असे वाटत होते.पण 18 व्या ओव्हरला संपूर्ण मॅच फिरली होती.

कराची किंग्जकडून 11 वी ओव्हर हसन अली घेऊन आला होता.हसनच्या पहिल्या बॉलवक बेन मॅकडरमोटने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर हसनने नवाजची विकेट काढली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर त्याने टॉम करनला आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर चौथा बॉल डॉट. पाचव्या बॉलला अहमद डेनियालने चौकार मारला. त्यानंतर सहाव्या बॉलवर डेनियलची विकेट काढली. या ओव्हरमध्ये हसनने 5 धावा देऊन 3 विकेट काढल्या आणि इकडेच संपूर्ण मॅच फिरली.

advertisement

शेवटच्या ओव्हरला 6 बॉलला 30 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी क्वेटा ग्लेडिएटर्सने 15 धावा काढल्या.त्यामुळे संघ फक्त 167 धावाच करू शकला होता.त्यामुळे हा सामना कराची किंगने 14 धावांनी जिंकला आहे.

दरम्यान या सामन्यात सौद शकील 33 आणि शामिल हुसैनन 52 धावांची चांगली सूरूवात केली होती. पण नंतर विकेट पडल्यानंतर इतर खेळाडूंना डाव सावरता आला नाही,त्यामुळे क्वेटाने हा सामना हारला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

कराची किंगने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 181 धावा केल्या होत्या.कराचीकडून मोईन अलीने 29 बॉलमध्ये 48 धावांची नाबाद खेळी केली होती. यासोबत कॅप्टन डेविड वॉर्नरने 35 धावांची खेळी केली होती. या बळावर त्यांनी 181 धावांपर्यंत मजल मारली होती.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : शेवटच्या ओव्हरला मोठा ड्रामा, तीन बॉलमध्ये मॅच कशी फिरली? डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात टीमचा विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल