TRENDING:

Vaibhav Suryavanshi : द्रविडने मिटींगला बोलावलं, वैभवने गेमप्लान सांगताच ड्रेसिंग रूममध्ये सगळे पोट धरून हासले,पाहा VIDEO

Last Updated:

टीम इंडियाच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सांगितलेल्या किस्सा प्रचंड चर्चेत आला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavanshi on Naman Award 2026 : बीसीसीआयचा नमन ॲवॉर्ड 2026चा सोहळा सूरू आहे. या सोहळ्यात वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा टी20 संघ,महिलांचा वनडे चॅम्पियन संघ आणि अंडर 19 चॅम्पियन संघाचा गौरव करण्यात आला. या दरम्यान काही खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारही देण्यात आले.तसेच यावेळी खेळाडूंनी मैदानावरच किंवा ड्रेसिंग रुममधले काही किस्सेही शेअर केले. यावेळी टीम इंडियाच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने सांगितलेल्या किस्सा प्रचंड चर्चेत आला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
sanju samson,vaibhav sooryavanshi
sanju samson,vaibhav sooryavanshi
advertisement

खर तर हर्षा भोगले यांनी या ॲवॉर्ड सोहळ्यात हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीला स्टेजवर बोलावलं होतं. या दरम्यान हर्षा भोगले यांनी खेळाडूंना तुम्ही खेळला तुमचा पहिला बॉल तुम्ही कुठे मारलेला? यावर सर्व खेळाडूंनी उत्तर दिलं.यानंतर वैभव सूर्यंवंशी म्हणाला मी सिक्स मारला होता.

दरम्यान पुढे वैभव सूर्यवंशीला हर्षा भोगले यांनी विचारलं.तु जे राजस्थान रॉयल्स टीमचे कोच इथे बसले आहेत. ज्यावेळी तुला पहिल्यांदा खेळायची संधी मिळाली तेव्हा तुझी कोच राहुल द्रविड सोबत काय चर्चा झाली. यावर तो म्हणाला मला संधी मिळाली तर मी खेळेन आणि मला जर बॉल टप्प्यात मिळाला तर मी तो उडवेन असे म्हणताच सगळेच हसायला लागले.

advertisement

पण यानंतर संजू सॅमसनने हा संपूर्ण किस्सा सांगितला. संजूला द्रविड म्हणाला आपल्या टीममध्ये एक युवा खेळाडू आला आहे,त्याच्याशी आपल्याला बोलावे लागेल.त्यानुसार वैभव सूर्यवंशीला ड्रेसिंग रुममध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर वैभवला त्याचा गेमप्लान विचारण्यात आला होता.यावेळी संजूने वैभव सूर्यवंशीची मिमिक्री करत संपुर्ण किस्सा सांगितला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

मला खेळायला मिळालं तर मी नक्कीच खेळीन आणि बॉल मिळाला तर मी उडवेन (सिक्स मारेन.)त्यामुळे हा तर वेगळाच व्हिडिओ गेम खेळायच्या विचारात आहे, असे संजू सॅमसन शेवटी म्हणाला आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : द्रविडने मिटींगला बोलावलं, वैभवने गेमप्लान सांगताच ड्रेसिंग रूममध्ये सगळे पोट धरून हासले,पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल