सॅमसनच्या एक्झिटमुळे राजस्थान रॉयल्सच्या रणनीतीवर परिणाम
सॅमसन संघातून बाहेर पडल्यामुळे अनेक गॅप निर्माण झाला होता, हे मॅनेजमेंटने मान्य केलं. 2021 मध्ये सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे संघाला कोणत्या प्रकारच्या प्लेयरची गरज आहे आणि मॅच जिंकण्यासाठी कोणती प्रोफाईल आवश्यक आहेत, याची चांगली समज आहे. सॅमसनच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, ती भरून काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यत: त्याला ट्रेड बाहेर जाण्याची परवानगी देताना, संघातील इतर कमतरता दूर करण्याचा प्रयत्न टीमने केला.
advertisement
ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशीमुळे मिळाली मदत
संजू सॅमसनच्या जाण्यामुळे आलेले मोठे आव्हान पेलण्यासाठी राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना संघात सामील करून घेतले. या दोन प्लेयर्समुळे संघातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यास मदत झाली आहे. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, या बदलांमुळे आणि संघात असलेल्या ध्रुव जुरेल आणि वैभव सूर्यवंशी यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे सॅमसनने सोडलेली काही जागा भरून काढता येईल. उदाहरणार्थ, ध्रुव जुरेल विकेटकिपिंग करू शकतो आणि वैभवने गेल्या वर्षी सलामीच्या जागेवर चांगली कामगिरी केली होती.
आयपीएल 2026 साठी संघाची रणनीती
संघाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं की, प्रत्येक वर्षी आम्ही मागील वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतो आणि पुढील वर्षासाठी काय सुधारणा करता येतील, याचा विचार करतो. IPL मध्ये 125 कोटींच्या मर्यादेत ट्रॉफी जिंकणारा संघ बनवणे ही तज्ज्ञ आणि मालकांसाठी एक मोठी समस्या असते, कारण प्रत्येक टीमची क्रिकेट खेळण्याची विचारसरणी वेगळी असते. कुमार संगकारा, मनोज आणि संजूने पहिल्यांदा नवीन आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यापासून यावर चर्चा करत होतो, असं व्यवस्थापनाने सांगितलं.
