रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपमध्ये सध्या मेघालय आणि अरूणाचल प्रदेश या दोन संघात सामना सूरू आहे. या सामन्यात मेघालयचा क्रिकेटपटू आकाश कुमार चौधरीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्या दरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफी इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. सुरतच्या पिठावाला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आकाशने फक्त 11 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे.त्याच्या धमाकेदार खेळीमुळे मेघालयने त्यांचा पहिला डाव 628/6 वर घोषित केला आहे.
advertisement
आकाशकडून वेन व्हाईटचा रेकॉर्ड ब्रेक
आकाश कुमार चौधरीने वेन व्हाईटचा मागील विक्रम मोडला. 2012 मध्ये एसेक्सविरुद्ध लीसेस्टरशायरकडून खेळताना व्हाईटने 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. पण आकाशने 14 बॉलमध्ये नाबाद 50 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होतायादरम्यान, आकाशने 126
व्या षटकात लिमार डॅबीच्या सर्व सहा बॉलवर सहा षटकार मारले.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका खेळाडूने एकाच षटकात सलग सहा षटकार मारण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीचा विक्रम रवी शास्त्री यांनी १९८४-८५ मध्ये तिलक राजविरुद्ध केला होता. एकूणच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सलग सहा षटकार मारण्याची ही तिसरी वेळ आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक (चेंडूनुसार)
11- आकाश कुमार चौधरी, मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश, सुरत,2025
12- वेन व्हाइट, लीसेस्टरशायर विरुद्ध एसेक्स, लीसेस्टर, 2012
13- व्हॅन वुरेन, पूर्व प्रांत ब विरुद्ध ग्रिक्वालँड वेस्ट, क्रॅडॉक, 1984/85
14- नेड एकर्सली, लीसेस्टरशायर विरुद्ध एसेक्स, लीसेस्टर, 2012
15- खालिद महमूद, गुजरांवाला विरुद्ध सरगोधा, गुजरांवाला, 2000/01 15- बंदिप सिंग, जम्मू आणि काश्मीर विरुद्ध त्रिपुरा, आगरतळा, 2015/16
मेघालयाकडून पहिल्या डावात अर्पित भटेवाराने 273 बॉलमध्ये 207 धावा काढल्या, ज्यामध्ये 23 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. राहुल दलाल आणि कर्णधार किशन लिंगडोह यांनीही शतके झळकावली. राहुलने 102 चेंडूत 144 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. लिंगडोहने 187 चेंडूत 119 धावा केल्या. लिंगडोहच्या डावात 14 चौकार आणि एक षटकार होता. अरुणाचल प्रदेशकडून टीएनआर मोहितने सर्वाधिक तीन बळी घेतले.
आकाश चौधरीची कारकीर्द
आकाश कुमार चौधरीने आतापर्यंत 31 प्रथम श्रेणी, 28 लिस्ट ए आणि 30 टी२० सामने खेळले आहेत. उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या आकाशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 553 धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतके आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चेंडूनेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, 87 बळी घेतले आहेत.
२५ वर्षीय आकाश कुमार चौधरीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 203 धावा (15.61सरासरी, 1अर्धशतक) आणि 37 बळी (29.24सरासरी) घेतले आहेत. टी20 सामन्यांमध्ये आकाशने 107 धावा (10.70 सरासरी) आणि 28 बळी (26.25 सरासरी) घेतले आहेत.
