TRENDING:

Ranji Trophy : रहाणेसह सगळेच ढेपाळले,मग सरफराज खानच्या भावाची वादळी खेळी,मुंबईला मोठ्या संकटातून वाचवलं

Last Updated:

आयुष्य म्हात्रे आणि अजिंक्य रहाणेसह सगळेच खेळाडू हिमाचलच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले होते. अशावेळी सरफराज खानचा भाऊ मुशीन खानने जबरदस्त शतकीय खेळी केली आहे.या खेळीच्या बळावर त्याने मुंबईचा डाव सावरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 musheer khan hit century
musheer khan hit century
advertisement

Ranji Trophy Musheer Khan Century : रणजी ट्रॉफी स्पर्धेत सध्या मुंबई आणि हिमाचल प्रदेश या दोन संघात सामना सूरू आहेत. या सामन्यात आज पहिल्याच दिवशी मुंबईची अवस्था बिकट झाली होती. कारण आयुष्य म्हात्रे आणि अजिंक्य रहाणेसह सगळेच खेळाडू हिमाचलच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले होते. अशावेळी सरफराज खानचा भाऊ मुशीन खानने जबरदस्त शतकीय खेळी केली आहे.या खेळीच्या बळावर त्याने मुंबईचा डाव सावरला आहे.

advertisement

खरं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचे सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण सलामीवीर आयुष म्हात्रे अवघ्या 9 धावा करून बाद झाला होता. त्याच्या पाठोपाठ आलेला अजिंक्य देखील 2 धावांवर बाद झाला.अजिंक्यनंतर हिमांशु सिंहला आला पण तो शुन्यावर बाद झाल्याने आल्या पावली माघारी गेला.

advertisement

मुंबईचे एका मागून एक विकेट पडत असताना मुशीर खान मात्र एका बाजूने संघाचा डाव सावरून होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ सरफराज खान मैदानात आला होता. त्यामुळे दोघे मुंबईचा डाव पुढे नेतील असे वाटत असताना सरफराज खान 16 वर बाद झाला होता.त्यामुळे मुंबईची 74 धावांवर 4 बाद अशी बिकट अवस्था झाली होती.

advertisement

दरम्यान सिद्धेश लाड आणि मुशीर खानने मुंबईचा डाव सावरला. मुशीर खानने 148 बॉलमध्ये 101 धावांची नाबाद शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 12 चौकार लगावले आहेत. मुशीर सोबत सिद्धेश लाडने 78 धावांची नाबाद खेळी केली आहे.या खेळीत त्याने 13 चौकार मारले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या धावांच्या बळावर सध्या मुंबई 4 विकेट गमावून 217 धावांपर्यंत मजल मारू शकली आहे.त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरला आहे. आता हे दोन्ही खेळाडू मुंबईचा डाव आणखी किती धावांपर्यंच नेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

advertisement

मुंबईचा संघ : आयुष म्हात्रे, मुशीर खान, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सरफराज खान, आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलाणी,शार्दुल ठाकूर (कर्णधार), हिमांशू सिंग, तुषार देशपांडे,सिल्वेस्टर डीसूझा

हिमाचलचा संघ : सिद्धांत पुरोहित, अंकुश बैंस (कर्णधार/ विकेटकिपर), अंकित कलसी, पुखराज मान, एकांत सेन, निखिल गंगटा, मयंक डागर, आर्यमान सिंग, वैभव अरोरा, अर्पित गुलेरिया, विपिन शर्मा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लग्नासाठी रेडीमेड ब्लाऊज फक्त 200 रुपयांपासून, आकर्षक डिझाईनमध्ये इथं करा खरेदी
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : रहाणेसह सगळेच ढेपाळले,मग सरफराज खानच्या भावाची वादळी खेळी,मुंबईला मोठ्या संकटातून वाचवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल