बिनकामाचा खेळाडू रिलीज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकूण 17 खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यामध्ये 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. संघाने आत्तापर्यंत एकूण 108.60 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्याकडे अजून 16.40 कोटी रुपये शिल्लक (Cap remaining) आहेत. अशातच आता आरसीबीने सर्वात मोठ्या किंमतीचा बिनकामाचा खेळाडू रिलीज केला आहे. त्याचं नाव लियाम लिविंगस्टोन...
advertisement
आयत्या बिळावरचा नागोबा
आरसीबीने मागील हंगामात ट्रॉफी उचलली पण यात लिविंगस्टोनचा काडीमात्र संबंध नव्हता. लियाम लिविंगस्टोन याला मागील आयपीएलमध्ये 8.75 कोटींच्या किंमतीत घेतलं होतं. मागील हंगामात त्याने एकूण 10 मॅच खेळल्या, ज्यात त्याच्या बॅटने निराशा केली. त्याने फक्त 112 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा 16 च्या सरासरीने आणि 133.33 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होता. यामध्ये त्याने फक्त एक फिफ्टी झळकावली होती. तर दोन विकेट्स देखील काढल्या होत्या.
RCB ने रिटेन केल्या खेळाडूंची यादी - रजत पाटीदार (कॅप्टन), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा.
RCB ने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी - स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सीफर्ट, लियाम लिविंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजाराबानी आणि मोहित राठी.
