TRENDING:

VIDEO : प्रत्येक बॉलवर अपिल...रोहित शर्माने कुलदीपला झाप झाप झापलं, आता पुढे कधीच DRS मागणार नाही!

Last Updated:

खरं तर टी20 वर्ल्ड कप 2026 ला येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी रोहित शर्माने टीम इंडियाच्या टीम कॉम्बिनेशनवर प्रतिक्रिया दिली आहे.त्याचसोबत सतत डीआरएसची मागणी करणाऱ्या कुलदीप यादवलला झापलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma on Kuldeep Yadav : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा नेहमीच युवा खेळाडूंना मैदानात फटकारत असतो. मग तो यशस्वी जयस्वालला गार्डन मे घुम रहा है क्या? हा टोमणा असो किंवा सतत डिआरएस मागणाऱ्या कुलदीप यादववर चिडलेला रोहित असो. सर्वांत जास्त रोहित कुलदीप यादववर मैदानात चिडताना दिसतो. पण या टी20 वर्ल्डकपमध्ये कुलदीप चिडायला रोहित नसणार आहे. पण असे जरी असले तरी या स्पर्धेआधीच रोहित शर्मा कुलदीप यादववर चिडला आहे.
Rohit Sharma on Kuldeep Yadav
Rohit Sharma on Kuldeep Yadav
advertisement

खरं तर टी20 वर्ल्ड कप 2026 ला येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी रोहित शर्माने टीम इंडियाच्या टीम कॉम्बिनेशनवर प्रतिक्रिया दिली आहे.त्याचसोबत सतत डीआरएसची मागणी करणाऱ्या कुलदीप यादवलला झापलं आहे.कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती हे दोघे खेळाडू टीम इंडियाचे ट्रम्प कार्ड आहेत.या खेळाडूंच्या कॉम्बिनेशनवर बोलताना रोहित म्हणाला की, सर्वात मोठं चॅलेंज हेच आहे की दोघांना एकत्र खेळवायचं कसं? पण जर कॉम्बिनेशन बनवायचा असेल तर दोघांना त्याचवेळी खेळवता येईल जेव्हा तुम्हाला दोन सीमर सोबत खेळवलात तर,असे तो म्हणाला.

advertisement

तसेच कुलदीप यादव सतत डिआरएस मागत असतो.त्याला काय सल्ला देशील?असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्मा म्हणतो, काहीच अॅडवाईस नाही आहे, भाई साहबसाठी. चुपचाप बॉल टाक आणि मागे जा, प्रत्येक बॉलवर तू अपिल करू शकत नाही,अशा शब्दात रोहितने त्याला झापलं.

advertisement

कुलदीप यादवने चूक कबुल केली

दरम्यान साऊथ आफ्रिकेविरूद्ध वनडे सामन्या दरम्यान देखील रोहित शर्मा कुलदीप यादववर डिआरएसच्या मागणीवरून चिडला होता. या वादानंतर कुलदीपने आपली चुक कबुल केली होती.डीआरएस घेण्यामध्ये मी खूप वाईट आहे, हे त्याला (रोहित)माहित आहे,त्यामुळे तो माझे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करतो.जर बॉल पॅडवर आदळला तर मला असं वाटते की प्रत्येक बॉलवर एक विकेट आहे, असे कुलदीप यादव सांगतो.

advertisement

जेव्हा तुमचा माजी कर्णधार असतो.केएल विकेटच्या मागे खरोखर चांगला आहे आणि विशेषतः डीआरएस कॉलमध्ये, गोलंदाज म्हणून तुम्हाला असे वाटते की प्रत्येक नॉट आउट आउट आहे. म्हणून तुम्हाला शांत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याभोवती असे लोक असले पाहिजेत, असे देखील त्याने पुढे कबूल केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

दरम्यान वर्ल्ड कप आधी रोहित शर्माची एक मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या रिलीज होणार आहे. या मुलाखतीची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : प्रत्येक बॉलवर अपिल...रोहित शर्माने कुलदीपला झाप झाप झापलं, आता पुढे कधीच DRS मागणार नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल