TRENDING:

Rohit Sharma : हिटमॅनने पुन्हा जिंकलं मन! कपिल देव यांनी हट्ट धरला पण धोनीसमोर रोहितने काय केलं? एकदा Video पाहा

Last Updated:

Rohit Sharma Viral Video : टीम इंडियाचा वनडे कॅप्टन रोहित शर्मा याने कपिल देव यांचा मान राखत एका कार्यक्रमात सर्वांचं मन जिंकलं. हिटमॅनने काय केलं? पाहा त्याचा व्हिडीओ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma Cutting Ceremony Video : भारतीय क्रिकेट टीमचे वनडे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी, त्याने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी करत असताना रोहित शर्मा याने तब्बल 10 किलो वजन कमी केलं आहे. रोहित शर्माचा जवळचा मित्र आणि भारताचे माजी असिस्टंट कोच अभिषेक नायर याने हिटमॅनच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता. अशातच कोलकातामधील एका कार्यक्रमात रोहितने सर्वांचं मन जिंकलं.
Rohit Sharma Cutting Ceremony Video
Rohit Sharma Cutting Ceremony Video
advertisement

तिन्ही स्टार कॅप्टन एकाच मंचावर

टीम इंडियाला 1983 मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव, टीम इंडियाचा 2011 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि टीम इंडियाला 2024 चा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन रोहित शर्मा एकाच मंचावर दिसून आले. कोलकाताच्या एका कार्यक्रमात तिन्ही स्टार कॅप्टन हजर होते. त्यावेळी तिघांनी आपापले अनुभव शेअर केले अन् या प्रसंगी उद्घाटन देखील केलं. रोहितने यावेळी कपिल देव यांना मान दिला.

advertisement

कपिल देव यांनी हट्ट धरला तरी...

रिबिन कट करण्याचा कार्यक्रम सुरू असताना कपिल देव सिनियर असल्याने त्यांच्या हातात कात्री देण्यात आली. तर रोहित आणि धोनी बाजूला उभे होते. कपिल देव यांनी रोहितच्या हातात कात्री देण्याचा प्रयत्न केला. रोहितने मात्र कात्री हातात घेतली नाही अन् त्यांनाच रिबिन कट करण्यास सांगितलं. कपिल देव यांनी हट्ट धरला तरी देखील हिटमॅनने त्यांनाच उद्घाटन करण्यास फोर्स केला. त्यानंतर कपिल देव यांनी रिबिन कट केली.

advertisement

दरम्यान, रोहित शर्मा लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. रोहित शर्माचे वय आणि त्यांचे 2027 चा वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup) खेळण्याचे लक्ष्य रोहितने ठेवलं आहे. अशातच आता रोहित शर्मा वनडेमध्ये कशी कामगिरी करणार? असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : हिटमॅनने पुन्हा जिंकलं मन! कपिल देव यांनी हट्ट धरला पण धोनीसमोर रोहितने काय केलं? एकदा Video पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल