TRENDING:

विराट-रोहित येणार तर सुटली पैशांची हाव, बलाढ्य टीमने आखला तिजोरी भरण्याचा डाव!

Last Updated:

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या लोकप्रियतेचा आर्थिक फायदा उचलण्यासाठी एका बलाढ्य देशाच्या क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्ड कप खेळत आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर 28 मार्चपासून आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे. आयपीएल संपल्यानंतरही भारतीय टीमचं संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक पॅक आहे, पण या वेळापत्रकात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, पण या दौऱ्यात टीम इंडियाच्या वनडे सीरिजमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे, पण न्यूझीलंड दौऱ्यात वनडे सीरिजचे सामने 3 वरून 5 होण्याची शक्यता आहे.
विराट-रोहित येणार तर सुटली पैशांची हाव, बलाढ्य टीमने आखला तिजोरी भरण्याचा डाव!
विराट-रोहित येणार तर सुटली पैशांची हाव, बलाढ्य टीमने आखला तिजोरी भरण्याचा डाव!
advertisement

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विनंती

न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे सीरिजचे सामने 3 वरून 5 करण्यात यावेत, अशी विनंती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे केली आहे, असं वृत्त समोर आलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे या मागणीचं प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहेत. विराट आणि रोहित फक्त वनडे खेळत असल्यामुळे चाहत्यांचा कल वनडे क्रिकेटकडे वाढला आहे, त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही मागणी केली आहे.

advertisement

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने वेळापत्रक बदलाबाबत बीसीसीआयला आधीच एक योजना सादर केली आहे. भारतीय टीमच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2022 पासून टीम इंडिया चार वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या दौऱ्यातील टेस्ट सीरिज 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असेल. फायनलच्या रेसमध्ये राहण्यासाठी टीम इंडियाला टेस्ट सीरिजमध्ये विजय आवश्यक असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त वनडे खेळत असल्याने, कोणत्याही क्रिकेट बोर्डाला त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा असेल. दोघांचीही ब्रँड व्हॅल्यू प्रचंड आहे आणि सीरिजच्या सामन्यांची संख्या वाढल्याने प्रसारक, आयोजक आणि क्रिकेट बोर्डाला याचा आर्थिक फायदा होईल, यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड 5 वनडे मॅचची सीरिज खेळवायला आग्रही आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट-रोहित येणार तर सुटली पैशांची हाव, बलाढ्य टीमने आखला तिजोरी भरण्याचा डाव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल