खरं भारतासमोर अवघ्या 124 धावांचे आव्हान होते. हे आव्हान सहज पुर्ण करून भारताला हा सामना जिंकता आला असता. पण भारतीय संघ 93 वर ऑलआऊट हा झाला होता.हा सामना भारत सहज जिंकेल असे वाटत होते.पण टेम्बा बावुमाच्या नेतृ्त्वात आफ्रिकेने पलटवार करत सामना जिंकला.
दरम्यान भारताच्या या पराभवानंतर आता गौतम गंभीर आणि टीम इंडियाला खडेबोल सुनावले जात आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आता टीम इंडियाच्या रणनितीवर टीका केली आहे. जरी आम्ही (भारताने) पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली तररी अशा नियोजनासह आम्ही स्वतःला अव्वल कसोटी संघ म्हणवू शकत नाही,अशा शब्दात त्यांनी गंभीरच्या स्ट्रेटेजीवर टीका केली. तसेच चुकीच्या पद्धतीने निवड आणि तांत्रिक बाबी न तपासता घेतलेल्या निर्णयाने हा निकाल उलटला आहे.इंग्लंडमध्ये अनिर्णित मालिका वगळता कसोटीत वर्षभरात खराब निकाल,अशा शब्दात त्यांनी भारताच्या पराभवावर टीका केली.
दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 159 धावांवर ऑलआऊट झाली, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने 189 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 30 धावांची लीड मिळाली होती. साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. त्यानंतर आता टीम इंडिया 93 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यानंतर आता साऊथ अफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सिरीजमध्ये पाहुण्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
भारत: यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
साउथ अफ्रीका: एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन (विकेटकीपर), साइमन हार्मर, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
