TRENDING:

SA vs NZ : 'चोकर' शब्दावरून साऊथ अफ्रिकेचे हेड कोच शुक्री कॉनराड भडकले; छाती ठोकून सांगितलं एका गोष्टीच्या जोरावर जिंकणार वर्ल्ड कप!

Last Updated:

SA vs NZ SemiFinal : दक्षिण आफ्रिकेवर अनेकदा लागणाऱ्या चोकर या शब्दावर कॉनराड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी टीकाकारांना चांगलाच टोला लगावला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
South Africa vs New Zealand : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आतापर्यंत अजेय राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेचे हेड कोच शुक्री कॉनराड यांनी टीमच्या यशाचे श्रेय आपल्या बॉलर्सना दिले आहे. भारताच्या कठीण परिस्थितीशी जुळवून घेत बॉलर्सनी ज्या प्रकारे कामगिरी केली, त्याबद्दल कॉनराड यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं. जिम्बाब्वे विरुद्ध 5 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर कॉनराड म्हणाले की, आमच्याकडे इतर टीम्ससारखे कोणतेही मिस्ट्री स्पिनर नसले, तरी जागतिक दर्जाचे वेगवान बॉलर असून त्यांनी प्रत्येक मॅचमध्ये आपली छाप सोडली आहे.
 South Africa head coach Shukri Conrad gets angry
South Africa head coach Shukri Conrad gets angry
advertisement

हेड कोच शुक्री कॉनराड भडकले

दक्षिण आफ्रिकेवर अनेकदा लागणाऱ्या चोकर (Choker) या शब्दावर कॉनराड यांनी चोख प्रत्युत्तर दिले असून त्यांनी टीकाकारांना चांगलाच टोला लगावला आहे. या शब्दाचा वापर करणाऱ्यांना उत्तर देताना ते उपरोधिकपणे म्हणाले की, जर तुम्ही 'सी' अक्षरावरून चोकर शब्द वापरत असाल, तर त्यात कपकेक हा शब्दही जोडून घ्या, तो विसरू नका. 4 मार्च रोजी कोलकाता येथे होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनलसाठी टीम पूर्णपणे सज्ज असून खेळाडूंचा आत्मविश्वास सध्या गगनाला भिडला आहे.

advertisement

पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर टीमच्या काही चांगल्या आठवणी असून तिथल्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा आपला जुना दबदबा निर्माण करण्यासाठी खेळाडू उत्सुक आहेत. मॅचच्या सुरुवातीला विकेट्स पडणे ही आदर्श स्थिती नसली, तरी मिडल ऑर्डरने ज्या प्रकारे जबाबदारी स्वीकारली, ते कौतुकास्पद असल्याचे कॉनराड यांनी सांगितले. 5 मार्चच्या दुसऱ्या सेमी फायनलआधी दक्षिण आफ्रिका आपली ताकद दाखवून फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे.

advertisement

टीम विजयासाठी सज्ज

दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकून आपली दावेदारी मजबूत केली असून त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्याचे कोचनी स्पष्ट केले आहे. अंडरडॉग म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा एक मजबूत टीम म्हणून मैदानात उतरणे आम्हाला अधिक आवडेल, असे धाडसी विधान त्यांनी यावेळी केले आहे. कठीण परिस्थितीत फलंदाजांनी दाखवलेला संयम आणि केलेली भागीदारी हा टीमसाठी एक सकारात्मक संकेत असल्याचे मानले जात असून टीम आता विजयासाठी सज्ज झाली आहे.

advertisement

नशिबाची थोडी साथ अपेक्षित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाया जाणाऱ्या पाण्याचा असा उपयोग,माऊली यांचा 'हराळवाडी पॅटर्न' चर्चेत,काय केलं?
सर्व पहा

दरम्यान, बुधवारी होणाऱ्या या महामुकाबल्यात दक्षिण आफ्रिकेची रणनीती अत्यंत स्पष्ट असून त्यांना नशिबाची थोडी साथ अपेक्षित आहे, असं म्हणत नशिबाच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकणार असल्याचं साऊथ अफ्रिकेने म्हटलं आहे. कोलकात्यात विजय मिळवून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलमध्ये धडक मारण्याचे त्यांचे मुख्य लक्ष्य असून टीम त्या दिशेने वाटचाल करत आहे. टीम सध्या योग्य लयीत असून सेमी फायनलसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सर्व खेळाडू मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार असल्याचे कॉनराड यांनी शेवटी नमूद केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SA vs NZ : 'चोकर' शब्दावरून साऊथ अफ्रिकेचे हेड कोच शुक्री कॉनराड भडकले; छाती ठोकून सांगितलं एका गोष्टीच्या जोरावर जिंकणार वर्ल्ड कप!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल