TRENDING:

सचिनची विकेट घेणारा 'धुरंदर' म्हणतो 'शोले'च ऑल टाईम फेव्हरेट, विनोद कांबळी सोबतही मैदान गाजवलं,कोण आहे तो?

Last Updated:

एका सचिन तेंडुलकरची विकेट घेणाऱ्या खेळाडूने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना धुरंदर की शोले यापैकी कोणता सिनेमा आवडतो? असा सवाल करण्यात आला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sairaj Bahutule News : टीम इंडियाचं नेतृत्व अनेक खेळाडूंनी केले आहे. या पक्तीत अनेक नाव आहेत. काही नाव तर तुम्हाला आठवणार देखील नाही, पण त्यांच क्रिकेटमध्ये चांगल योगदान आहे. अशाच एका सचिन तेंडुलकरची विकेट घेणाऱ्या खेळाडूने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना धुरंदर की शोले यापैकी कोणता सिनेमा आवडतो? असा सवाल करण्यात आला होता.यावेळी त्याने शोलेच ऑल टाईम फेव्हरेट असल्याचे सांगितले आहे. तसेच या खेळाडूने विनोद कांबळी सोबत देखील मैदान गाजवलं आहे. त्यामुळे हा दिग्गज खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
Sairaj Bahutule
Sairaj Bahutule
advertisement

खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू साईराज भाऊतुले आहे. साईराज यांनी नुकतीच एक रॅपिड फायर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. या मुलाखतीत त्यांना पहिला प्रश्न हा तुझा मजेशीर टीममेट कोण होता? यावर साईराज म्हणतात विनायक सामंत. तसेच तुझा बिगेस्ट पार्टी अॅनिमल कोण, तर विनोद कांबळी असे साईराज यांनी उत्तर दिले. तसेच स्लेजिंग करणारा प्लेअर कोण? तर त्यांनी सुनील मोरे आणि समीर दिघे यांनी नावे घेतली.

advertisement

पुढे साईराज भाउतुले त्यांचा फेव्हरेट बॉलिंग पार्टनर म्हणून निलेश कुलकर्णीच नाव घेतात. आणि बेस्ट कोच त्यांच्या मते चंद्रकांत पंडीत असल्याचे ते सांगतात. तसेच त्यांच्या मते बेस्ट टर्नर विकेट म्हणून ते वानखेडे स्टेडिअमला पसंती देतात. नरेंद्र हवानी हा त्यांच्या मते बेस्ट गुगली बॉलर आहे.याच मुलाखतीत त्यांनी सचिन तेंडुलकरची विकेट घेतल्याचीही माहिती दिली. चॅलेंजर ट्रॉफी दरम्यान त्याने ही विकेट घेतली होती. अनिल कुंबले आणि शेनवॉर्न या दिग्गज स्पिनर गोलंदाजांपैकी त्यांना शेनवॉर्न आवडतो. तसेच त्याना धुरंदर की शोले हा सिनेमा आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता.यावेळी त्यांनी सध्या सर्वांच्या पसंतीच्या असलेल्या धुरंदर चित्रपटाला नकार दिला आहे तर शोले त्यांचा ऑल टाईम फेवरेट सिनेमा आहे,असे ते सांगतात.

advertisement

कोण आहेत साईराज भाऊतुले?

साईराज भाऊतुले हे भारताचे माजी क्रिकेटर आहेत. ते लेग स्पिनjर गोलंदाज आणि फलंदाज म्हणजेच ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. त्यांच संपूर्ण नाव साईराज वसंत भाऊतुले आहे. त्यांचा जन्म हा 6 जानेवारी 1973 ला मुंबईत झाला होता.

साईराज भाऊतुले यांच्या क्रिकेट कारकि‍र्दीबद्दल बोलायचं झालं तर 1991-93 पासून त्यांनी क्रिकेट करिअरला त्यांनी सुरूवात केली.मुंबई संघासाठी ते 15 वर्ष खेळले, नंतर महाराष्ट्र, आसाम, आंध्र आणि विदर्भ संघांसाठीही खेळले. 2013 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

advertisement

साईराज भाऊतुले यांनी 188 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 6,176 धावा केल्या होत्या. यात त्यांचा सरासरी हा 31.83 होता. यामध्ये 9 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश होता. तर गोलंदाजीत त्यांनी 630 विकेटस घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे.

1997-98 मध्ये इराणी कपमध्ये त्यांनी 13 विकेटस घेतले होते त्यामुळे त्यांची भारतीय संघात निवड झाली होती.

advertisement

अंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दत बोलायचं झालं तर साईराज यांनी भारतासाठी फक्त 2 टेस्ट आणि 8 वनडे खेळले आहेत. त्यांना अनिल कुंबळे सारख्या स्पिनरमुळे जास्त संधी मिळाली नाहीत. टेस्टमध्ये 5 विकेट्स आणि वनडेमध्ये 23 धावा केल्या होत्या. त्यांची कारकिर्द मुख्यतः घरगुती क्रिकेटमध्ये चमकली. रणजी ट्रॉफीमध्ये 400 प्लस विकेट्स घेणारे फक्त काही गोलंदाजांपैकी ते एक आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

साईराज भाऊतुले सध्या क्रिकेट कोच म्हणून काम करत आहेत. आयपीएल 2026 मध्ये त्यांची पंजाब किंग्ज संघाच्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते राजस्थान रॉयल्सचे (2018-2021 आणि 2025)स्पिन कोच होते.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिनची विकेट घेणारा 'धुरंदर' म्हणतो 'शोले'च ऑल टाईम फेव्हरेट, विनोद कांबळी सोबतही मैदान गाजवलं,कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल