TRENDING:

सगळे अभिषेक, अभिषेक करत बसले; इकडे संजूने रेकॉर्ड बुक बदलले, वर्ल्डकप आधी संघात जागा नव्हती आता विराट बरोबरी

Last Updated:

T20 World Cup 2026 Final : संजू सॅमसनने अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 46 चेंडूत 89 धावा करत विक्रम खेळी केली. त्याच्या या वादळी खेळीत अनेक विक्रमांची नोंद झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 च्या फायनल मॅचमध्ये भारताचा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने न्यूझीलंडविरुद्ध तुफानी खेळी करत अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात सॅमसनने अवघ्या 46 चेंडूत 89 धावांची धडाकेबाज खेळी करत विक्रमी धावसंख्या करून देण्यास मदत केली.
News18
News18
advertisement

या टी-20 वर्ल्डकपमध्ये सॅमसनने मारलेल्या षटकारांची संख्या 21 वर पोहोचली असून टी-20 वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या Finn Allen च्या नावावर होता. अ‍ॅलनने एका वर्ल्डकपमध्ये 20 षटकार ठोकले होते, मात्र सॅमसनने हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला.

यासोबतच सॅमसनने आणखी एक दुर्मिळ कामगिरी केली. टी-20 वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 2009 मध्ये शाहीद आफ्रिदी आणि 2014 मध्ये विराट कोहलीने अशी कामगिरी केली होती. आता 2026 मध्ये सॅमसनने त्यांची बरोबरी केली आहे.

advertisement

सॅमसनने या स्पर्धेत सलग तीन सामने 50 किंवा त्याहून अधिक धावा करत आणखी एका विक्रमात स्थान मिळवले. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग तीन 50+ धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला आहे. या यादीत श्रीलंकेचे माहेला जयवर्धने (2010), भारताचा विराट कोहली (2016–2021), पाकिस्तानचा बाबर आझम (2021), भारताचा केएल राहुल (2021), श्रीलंकेचा कुसल मेंडीस (2026) आणि पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (2026) यांचा समावेश आहे.

advertisement

याचबरोबर एका टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही सॅमसन अव्वल खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंडचा फिन ऍलन (25 षटकार, पाकिस्तानविरुद्ध 2024) पहिल्या स्थानावर आहे. तर सॅमसनने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 24 षटकार मारत दुसरे स्थान पटकावले. त्याच संख्येने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (टी-20 वर्ल्ड कप आफ्रिका क्वालिफायर 2023/24) याचाही समावेश आहे.

advertisement

या सामन्यात सॅमसनला Ishan Kishan चीही चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून 105 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील ही दुसरी शतकी भागीदारी ठरली. यापूर्वी 2010 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या क्रेग किस्वेटर आणि केविन पीटरसन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 धावांची भागीदारी केली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

इतक नाही तर संजूने केलेल्या 89 धावा या टी20 विश्वचषकाच्या फायनल मॅचमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने 2016 आणि 2021 मध्ये मार्लन सॅम्युअल्स आणि केन विल्यमसन यांनी अनुक्रमे 85 (नाबाद) आणि 85 धावांचा विक्रम मागे टाकला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सगळे अभिषेक, अभिषेक करत बसले; इकडे संजूने रेकॉर्ड बुक बदलले, वर्ल्डकप आधी संघात जागा नव्हती आता विराट बरोबरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल