TRENDING:

Sayed Mushtaq Ali : 11 सिक्स, 9 फोर... 45 बॉलमध्ये ठोकले 125 रन, टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन!

Last Updated:

आयपीएल लिलावाच्या तोंडावर भारतीय विकेट कीपरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वादळी शतक ठोकलं आहे. पंजाबचा विकेट कीपर बॅटर सलिल अरोराने 39 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : आयपीएल लिलावाच्या तोंडावर भारतीय विकेट कीपरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वादळी शतक ठोकलं आहे. पंजाबचा विकेट कीपर बॅटर सलिल अरोराने 39 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं, यानंतर त्याने पुढच्या 6 बॉलमध्ये तब्बल 25 रन काढले. 45 बॉलमध्ये 125 रनवर सलिल अरोरा नाबाद राहिला, या शतकी खेळीमध्ये त्याने 9 फोर आणि 11 सिक्स ठोकले. सलिल अरोराने 277.78 च्या सरासरीने रन केल्या आहेत. सलिलच्या या वादळी खेळीमुळे पंजाबने झारखंडविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करत 235/6 पर्यंत मजल मारली.
11 सिक्स, 9 फोर... 45 बॉलमध्ये ठोकले 125 रन, टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन!
11 सिक्स, 9 फोर... 45 बॉलमध्ये ठोकले 125 रन, टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन!
advertisement

पुण्याच्या डी.वाय.पाटील अकॅडमीमध्ये झालेल्या या सामन्यात अरोराने सलिल अरोराने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये डावखुरा फास्ट बॉलर सुशांत मिश्रा याच्यावर आक्रमण केलं. सलिलने 20 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि एक फोर मारली, त्यामुळे पंजाबला 235 रन करता आले. पंजाबची अवस्था बिकट झालेली असताना सलिल अरोरा पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि त्याने ऐतिहासिक खेळी केली.

advertisement

आयपीएलच्या लिलावामध्ये सलिल अरोरा विकेट कीपरच्या कॅटेगरीमध्ये आहे. सलिलची बेस प्राईज 30 लाख रुपये आहे, पण या खेळीनंतर सलिल अरोरावर कोट्यवधींची बोली लागण्याची शक्यता आहे. कोलकाता नाईट रायडर्सना विकेट कीपरची गरज आहे, त्यामुळे लिलावामध्ये केकेआर सलिल अरोरासाठी मोठी बोली लावू शकते.

प्रथम श्रेणी पदार्पणातही शतक

सलिल अरोराने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पदार्पणातही शतक ठोकलं होतं. 2024-25 च्या रणजी ट्रॉफी मोसमात मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सलिलने 210 बॉलमध्ये 101 रन केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलिलने 9 सामन्यांमध्ये 41.63 च्या सरासरीने 458 रन केले आहेत, यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

advertisement

पंजाब बनली टी-20 क्रिकेटची फॅक्ट्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चवदार चविष्ट ग्रीन चिकन, हिरव्या मिरचीच्या पेस्ट पासून बनवा झटपट, बोट चाखून खाल
सर्व पहा

मागच्या काही काळामध्ये पंजाबमधून भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच क्रिकेटपटूंची एन्ट्री झाली आहे. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाका केला. तर प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, नमन धीर, अनमोल प्रीत सिंग यांनी आयपीएलमध्ये नाव कमवलं असून हे सगळे खेळाडू टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sayed Mushtaq Ali : 11 सिक्स, 9 फोर... 45 बॉलमध्ये ठोकले 125 रन, टीम इंडियाला मिळाला नवा हिटमॅन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल