TRENDING:

VIDE0 : 21 वर्षाच्या पोराची 21 बॉलमध्ये फिफ्टी, डेब्यू सामन्यात धुमाकूळ घातला, कोण आहे खेळाडू?

Last Updated:

एका 21 वर्षाच्या पोरानं डेब्यू सामन्यातच 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. या खेळीत त्याने 4 षटकार आणि पाच चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 216 च्या आसपास होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shamyl Hussain Half Century : आयपीएल 2026 च्या हंगामाला उद्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे.त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यात आता एका 21 पोरानं डेब्यू सामन्यातच 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. या खेळीत त्याने 4 षटकार आणि पाच चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 216 च्या आसपास होता.त्याची ही खेळी पाहून सगळेच शॉक झाले आहेत. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
Shamyl Hussains
Shamyl Hussains
advertisement

खरं तर कराची किंगने दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्वेटा ग्लेडिएटसर्ची सूरूवात चांगली झाली होती. कारण कॅप्टन सौद शकीलने 33 धावांची खेळी केली.त्याच्यासोबत पीएसलचा डेब्यू सामना खेळणाऱ्या 21 वर्षीय शामील हुसेनने 21 बॉलमध्ये हाफसेंच्यूरी केली होती. या खेळीत त्याने 4 षटकार आणि पाच चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 216 च्या आसपास होता.दोन्ही सलामीवीरांनी मिळून 88 धावांची खेळी केली होती. पण हसनच्या वादळासमोर कुणीही टीकू शकली नाही आणि एका पाठोपाठ एक विकेट पडल्या आणि क्वेटाने ग्लेडिएटर्सने सामना गमावला.

advertisement

खरं तर या सामन्यात क्वेटा ग्लेडिएटर्सला 12 बॉलमध्ये फक्त 35 धावांची गरज होती. ज्यावेळेस त्यांना इतक्या धावा करायच्या होत्या त्यावेळेस त्याच्या 4 विकेटच पडल्या होत्या.त्यामुळे क्वेटा सामना जिंकेल असे वाटत होते.पण 18 व्या ओव्हरला संपूर्ण मॅच फिरली होती.

कराची किंग्जकडून 10 वी ओव्हर हसन अली घेऊन आला होता.हसनच्या पहिल्या बॉलवक बेन मॅकडरमोटने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर हसनने नवाजची विकेट काढली. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर त्याने टॉम करनला आल्या पावली माघारी धाडले. त्यानंतर चौथा बॉल डॉट. पाचव्या बॉलला अहमद डेनियालने चौकार मारला. त्यानंतर सहाव्या बॉलवर डेनियलची विकेट काढली. या ओव्हरमध्ये हसनने 5 धावा देऊन 3 विकेट काढल्या आणि इकडेच संपूर्ण मॅच फिरली.

advertisement

शेवटच्या ओव्हरला 6 बॉलला 30 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी क्वेटा ग्लेडिएटर्सने 15 धावा काढल्या.त्यामुळे संघ फक्त 167 धावाच करू शकला होता.त्यामुळे हा सामना कराची किंगने 14 धावांनी जिंकला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू इतके महाग का झाले, द्राक्षाची काय स्थिती? मार्केटमधून मोठी अपडेट
सर्व पहा

कराची किंगने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 181 धावा केल्या होत्या.कराचीकडून मोईन अलीने 29 बॉलमध्ये 48 धावांची नाबाद खेळी केली होती. यासोबत कॅप्टन डेविड वॉर्नरने 35 धावांची खेळी केली होती. या बळावर त्यांनी 181 धावांपर्यंत मजल मारली होती.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDE0 : 21 वर्षाच्या पोराची 21 बॉलमध्ये फिफ्टी, डेब्यू सामन्यात धुमाकूळ घातला, कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल