भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनने 2012 रोजी आयेशा मुखर्जी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आयेशा मुखर्जी ही किक बॉक्सर असून मूळ ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. आयेशा मुखर्जीचा यापूर्वी देखील एक घटस्फोट झाला असून यातून तिला २ मुली आहेत. तर लग्नानंतर आयेशा आणि शिखर धवनने नोव्हेंबर 2014 मध्ये मुलाला जन्म दिला ज्याचे नाव झोरावर ठेवण्यात आले. मागील अनेक महिन्यांपासून शिखर आणि आयेशामध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात होते. त्यानंतर शिखर धवन आणि पत्नी आयेशा मुखर्जीने दिल्ली न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.
advertisement
दाम्पत्याच्या मुलाच्या कायमस्वरूपी ताब्यात घेण्याबाबत कोणताही आदेश देण्यास नकार देताना, न्यायालयाने धवनला आपल्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये योग्य कालावधीसाठी भेटण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवर त्याच्याशी चॅट करण्याचे अधिकार दिले आहेत. न्यायालयाने आयशाला पुढे शैक्षणिक दिनदर्शिकेदरम्यान शाळेच्या सुट्टीच्या अर्ध्या कालावधीसाठी धवन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मुक्काम करण्यासह मुलाला भेटीसाठी भारतात आणण्याचे आदेश दिले. धवनच्या याचिकेनुसार, पत्नीने सुरुवातीला ती त्याच्यासोबत भारतात राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु आयेशा ही तिच्या पूर्व पतीशी असलेल्या वचनबद्धतेमुळे ती असे करण्यात अयशस्वी ठरली.