खरं तर रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सगळ्यांसाठी चक्रावणारा होतो. कारण आतापर्यंत जम्मू काश्मीर त्यांच्या वेगवान गोलंदाजीच्या बळावर फायनल पर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे गोलंदाजी घेण्याऐवजी त्यांनी फलंदाजी घेतली. विशेष म्हणजे जरी सगळ्यांना हा निर्णय धक्कादायक वाटला तरी फलंदाजांनी मात्र हा निर्णय योग्य ठरवला आहे. जम्मू काश्मीरकडून कामरान इकबाल आणि येवर हसन फलंदाजीला उतरले होते. त्यात कामरान इकबाल 6 धावांवर बाद झाला होता.
advertisement
कामरान इकबाल जेव्हा बाद झाला होता तेव्हा 10 ओव्हर झाल्या होत्या.त्यानंतर येवर हसन आणि शुभम पुडीरने जम्मूचा डाव सावरला होता. येवर हसनने यावेळी 88 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 13 चौकार लगावले होते. हसननंतर शुभम पुंडीरने दिवसअखेर 117 धावांची नाबाद शतकीय खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 2 षटकार आणि 12 चौकार मारले होते. विशेष म्हणजे शुभम पुंडीरने सिक्स मारून शतक ठोकलं होत. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सेहवाग देखील अशाचप्रकारे शतक करायचा.त्याचप्रकारे शुभमने हे शतक ठोकलं आहे. शुभमच्या या खेळीनंतर तो 67 वर्षात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरकडून फायनलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
शुभम पुंडीरला यावेळी अब्दुल समदने 52 धावांनी नाबाद अर्धशतकीय खेळी करून चांगली साथ दिली होती.या बळावर जम्मूने दिवसअखेर 2 विकेट गमावून 284 धावा केल्या होत्या. जम्मूने पहिल्या दिवशी 87 ओव्हर खेळल्या. त्यातल्या त्यात पहिली विकेट 10 ओव्हरला पडल्यानंतर उरलेल्या 77 ओव्हर शुभम पुंडीर आणि इतर खेळाडू खेळले होते.
