शुभमन गिल काय म्हणाला?
शुभमन गिल सामन्यानंतर म्हणाला, 'हा एक उत्तम कसोटी सामना होता. आमच्याकडे संधी होत्या पण आम्ही झेल सोडले आणि खालच्या फळीनेही धावा काढल्या नाहीत, परंतु मला संघाचा अभिमान आहे आणि एकूणच हा एक चांगला प्रयत्न होता. काल आम्ही सुमारे 430 धावा काढल्यानंतर डाव घोषित करण्याचा विचार करत होतो, परंतु खालच्या फळीत धावा न मिळाल्याने ते कठीण झाले.' तो म्हणाला, 'आम्ही खालच्या फळीच्या योगदानाबद्दल बोललो पण ते खूप लवकर विकेट पडले. येत्या सामन्यांमध्ये आम्हाला यात सुधारणा करावी लागेल.'
advertisement
KL Rahul : शतक ठोकताच राहुलने केलं Rohit ला टार्गेट, टीकेचं हिटमॅनवर फोडलं खापर; नेमकं काय म्हणाला?
शुभमन गिलने खराब क्षेत्ररक्षणाचे समर्थन केले
झेल सोडल्यानंतर त्याच्या क्षेत्ररक्षणाचे समर्थन करताना तो म्हणाला, "अशा विकेटवर संधी सहज उपलब्ध होत नाहीत. हा एक तरुण संघ आहे आणि तो शिकत आहे. भविष्यात या गोष्टींमध्ये चांगली कामगिरी होईल अशी आशा आहे." गिल म्हणाला की, 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी वेळ आहे आणि जसप्रीत बुमराहबाबत सामन्यापूर्वी निर्णय घेतला जाईल . बुमराहच्या उपलब्धतेबद्दल विचारले असता तो म्हणाला, "आम्ही सामन्यांच्या हिशोबाने ठरवू. दुसरी कसोटी जवळ आल्यावर निर्णय घेतला जाईल." असं शुभमन म्हणाला.
बेन स्टोक्सने फलंदाजांचे कौतुक केले
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारताचे कौतुक केले पण विजयाचे श्रेय त्याचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांना दिले ज्यांनी अनुक्रमे 149 आणि 65 धावा केल्या. तो म्हणाला, "भारताने पहिल्या सत्रात शानदार खेळ केला. इंग्लंडमध्ये चौथ्या डावात खेळणे सोपे नाही पण जॅक आणि बेनने उत्तम भागीदारी करून विजयाचा पाया रचला." सामनावीर डकेट म्हणाला की बुमराहचा सामना करण्यासाठी मार्ग शोधणे महत्त्वाचे होते. तो म्हणाला, "तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि त्याने पहिल्या डावात उत्कृष्ट कामगिरी केली. दुसऱ्या डावात आम्ही त्याची पुनरावृत्ती होऊ दिली नाही याचा आम्हाला आनंद आहे."
