शुभमनच्या वडिलांनी दिलं लेकाच्या लग्नावर उत्तर
अंकलजी गिल भाई की शादी कब कर रहे हो? (शुभमन गिलचं लग्न कधी करणार आहात) असा सवाल शुभमन गिलच्या वडिलांना विचारण्यात आला. त्यावर शुभमनच्या वडिलांनी उत्तर दिलं. त्यालाच माहिती आता आम्हाला काय माहिती, असं उत्तर शुभमन गिलच्या वडिलांनी दिलं. त्यावर सारा मॅडमसोबत करणार का? असा सवाल लखविंदर सिंग गिल यांना विचारला जात आहे. नाही असं काही नाही, असं उत्तर शुभमनच्या वडिलांनी यावर दिलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
शुभमनने तिसऱ्या बॉलवर सोडलं मैदान
कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कॅप्टन कर्णधार शुभमन गिलने मैदानावर उतरल्यानंतर लगेचच मैदान सोडलं. फक्त तीन बॉल खेळल्यानंतर आणि एक फोर मारल्यानंतर, मानेला ताण आल्यानं शुभमनला फिजिओसह मैदान सोडावं लागलं. सध्या त्याच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिक माहिती उपलब्ध नाही.
शुभमनच्या अफेअरची चर्चा
दरम्यान, अनेकदा सारा अली खान आणि सारा तेंडूलकरसोबत शुभमन गिलचं नाव जोडलं जातं. सारा तेंडुलकर व्यतिरिक्त, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अवनीत कौर यांच्यासोबतही शुभमनचे नाव जोडलं गेलं होतं. या सर्व चर्चांमुळे वैतागलेल्या शुभमन गिलने एका मुलाखतीत आपल्या रिलेशनशिप स्टेटसवर मौन सोडलं होतं. त्याने स्पष्ट केलं की, "मी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सिंगल आहे." त्यानंतर शुभमन गिलची चर्चा काही काळासाठी थांबली होती.
