TRENDING:

BCCI च्या एका नियमावर भडकला शुभमन गिल! रोहित शर्मानंतर आता गुजरातच्या कॅप्टनलाही अजिबात आवडलं नाही

Last Updated:

Shubhman Gill On Impact Player Rule : शुभमन गिलने 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर कडक शब्दांत टीका केली आहे. मुंबईत पार पडलेल्या आयपीएल कॅप्टन्सच्या बैठकीत गिलने या नियमाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shubhman Gill Captains Meeting : आयपीएल 2026 ला आता फक्त दोन दिवस बाकी असताना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्व संघांना काही प्लेयर्स बाजूला करून नव्या प्लेयर्ससोबत खेळण्याची मिळाली असताना आता बीसीसीआयचा एक नियम सर्वांना अडचणीचा ठरत आहे. त्यावर गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल याने बुधवारी नाराजी दर्शवली. शुभमन गिलने 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर कडक शब्दांत टीका केली आहे. मुंबईत पार पडलेल्या आयपीएल कॅप्टन्सच्या बैठकीत गिलने या नियमाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. बैठकीनंतर शुभमन गिल काय म्हणाला? जाणून घ्या.
Shubhman Gill On Impact Player Rule
Shubhman Gill On Impact Player Rule
advertisement

क्रिकेट फक्त 11 खेळाडूंचा गेम

माझ्या वैयक्तिक विचारानुसार इम्पॅक्ट प्लेयर रूल क्रिकेटमध्ये नसावा. क्रिकेट हा फक्त 11 खेळाडूंचा गेम आहे. यामध्ये जर आपण एक्स्ट्रा बॉलर किंवा बॅटर खेळवला तर खेळातील महत्त्व आणि खेळाडूच्या कौशल्याचं महत्त्व कमी होतं, असं मत शुभमन गिलने व्यक्त केलं आहे. अतिरिक्त बॅटर खेळवण्याच्या सुविधेमुळे खेळाचे स्वरूप बदलत आहे. जेव्हा काही बॅटर लवकर आऊट होतात, तेव्हा डाव सावरण्यासाठी जे कसब लागते, ते या नियमामुळे आता लोप पावत चाललंय, असं मत देखील शुभमन गिल याने व्यक्त केलंय.

advertisement

मला फारसं आवडलेलं नाही - शुभमन गिल

एका जास्तीच्या खेळाडूमुळे मॅच आता 'वन डायमेंशन' होत चालली आहे, असं शुभमन गिलने स्पष्ट केलं. आव्हानात्मक पीचवर 160 किंवा 180 धावांचा पाठलाग करणं हे 220 धावांच्या डोंगरापेक्षा जास्त थरारक असतं. बॅटरसाठी सोप्या असलेल्या सपाट पीचवर मोठी धावसंख्या उभारणं मला वैयक्तिकरित्या फारसं आवडलेलं नाही, असंही तो यावेळी म्हणाला.

advertisement

रोहित, हार्दिक पांड्यानेही उठवला आवाज

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्यानंतर आता गिलनेही या नियमाविरुद्ध आवाज उठवला आहे. इम्पॅक्ट प्लेयरमुळे बॉल आणि बॅटमधील समतोल बिघडत असल्याचे अनेक खेळाडूंचे मत आहे. तरीही, चाहत्यांच्या मनोरंजनासाठी बीसीसीआयने हा नियम सध्या तरी हटवण्यास नकार दिला असून 2027 पर्यंत हाच पॅटर्न सुरू राहील. 2023 पासून पाच वर्षांसाठी हा नियम लागू करण्यात आला होता.

advertisement

अंतिम निर्णय बोर्डाचाच असेल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, "बैठकीत आम्ही या विषयावर चर्चा केली, मात्र अंतिम निर्णय बोर्डाचाच असेल," असं देखील गिलने यावेळी नमूद केलं. सध्यातरी नाराज खेळाडूंना पुढील काही काळ या नियमासोबतच मॅचमध्ये उतरावे लागणार आहे. मात्र, बीसीसीआय आपला नियम मागे घेणार का? की आणखी दोन सीझन हा नियम पहायला मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI च्या एका नियमावर भडकला शुभमन गिल! रोहित शर्मानंतर आता गुजरातच्या कॅप्टनलाही अजिबात आवडलं नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल