खरं तर मुंबईने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात खराब झाली. इनिंगच्या पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलला गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आऊट झाला. ट्रेन्ट बोल्टने गिलला एलबीडब्ल्यू केलं, यानंतर कुसाल मेंडिस हिट विकेट आऊट झाला, पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरने मुंबईच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. साई सुदर्शनने 49 बॉलमध्ये 80 आणि वॉशिंग्टन सुंदरने 24 बॉलमध्ये 48 रनची खेळी केली.
advertisement
वॉशिंग्टन सुंदर आणि साई सुदर्शन गुजरातला जिंकवून देणार असं वाटत असतानाच मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला, त्यानंतर बुमराहने यॉर्कर बॉलवर सुंदरला बोल्ड केलं आणि मुंबईने सामन्यात कमबॅक केलं. यानंतर 2 ओव्हरनी साई सुदर्शनही बोल्ड झाला. यानंतर इतर खेळाडूने गुजरातला जिंकपण्यासाठी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले.
आता आयपीएलच्या बक्षीस रक्कमाप्रमाणे फोर्थ रनरअप असलेल्या संघाला 6.5 कोटी बक्षीस रक्कम मिळणार आहेत.त्यानुसार आता गुजरातला 6.5 कोटी बक्षीस रक्कम मिळाली आहे.
आयपीएल बक्षीस रक्कम
- आयपीएल 2025 जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी बक्षीस रक्कम मिळणार आहेत.
- उपविजेत्या संघाला 12.5 कोटी मिळणार आहे.
- थर्ड रनरअप 7 कोटी कोटी मिळणार आहेत.
- फोर्थ रनरअप 6.5 कोटी मिळणार आहेत.