TRENDING:

IND vs SA : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर? स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला नेलंय, धडकी भरवणारा फोटो समोर! नेमकं काय झालंय?

Last Updated:

Shubman Gill stretchered to hospital : टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल याला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला नेण्यात आलं आहे. त्याचा धक्कादायक फोटो समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shubman Gill Neck injury : कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा म्होरक्या शुभमन गिल जायबंदी झाला. बॅटिंगला आलेल्या शुभमन गिलला पाच मिनिट देखील मैदानात उभा राहता आलं नाही. तीन बॉल खेळल्यानंतर शुभमन गिल याने मैदान सोडलं. फिजिओंनी त्याला तातडीने ड्रेसिंग रुममध्ये येण्यास सांगितलं होतं. अशातच आता शुभमन गिलला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. शुभमनचा एक फोटो समोर आला असून अनेकांच्या काळजात धस्सस्सस झाल्याचं पहायला मिळतंय.
Shubman Gill stretchered to hospital with neck injury
Shubman Gill stretchered to hospital with neck injury
advertisement

स्ट्रेचरवरून अंगावर कपडा टाकून मैदानाबाहेर

काल सकाळपासून शुभमन गिलला मानेचा त्रास जाणवत होता. दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची विकेट गेल्यानंतर शुभमन गिल मैदानात आला. दोन बॉल डिफेन्ड केले अन् तिसऱ्या बॉलवर स्विप मारला. बॉल बॉन्ड्री लाईनकडे गेला तर इकडे शुभमन गिल याला दुखापत झाली. शुभमनला मान देखील हलवता येत नव्हती. त्यानंतर त्याने मैदान सोडलं. अशातच आता त्याला स्ट्रेचरवरून अंगावर कपडा टाकून मैदानाबाहेर घेऊन जातानाचा शॉकिंग फोटो समोर आला आहे.

advertisement

हॉस्पिटलमध्ये शुभमनचं स्कॅन

मानेला सपोर्ट देऊन शुभमनला हळूवार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुभमन उभा राहून नाही तर स्ट्रेचरवरून गेल्याने अनेकांनी भीती व्यक्त केली आहे. हॉस्पिटलमध्ये त्याच्या स्कॅन करण्यात आलं. त्यानंतर आता उर्वरित मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : शुभमन गिलची दुखापत किती गंभीर? स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला नेलंय, धडकी भरवणारा फोटो समोर! नेमकं काय झालंय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल