खरं तर 23 नोव्हेंबर 2025 ला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न होणार होतं. मात्र लग्नाला काही तास उरले असताना अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्टअटॅक आल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं.या सगळ्या घटनाक्रमा दरम्यान अनेक घडामोडी घडत होत्या. पलाशचे अनेक चार्ट देखील व्हायरल होत होते.तसेच दोघे पुन्हा 7 तारखेला लग्नबंधनात अडकतील अशी देखील माहिती समोर आली होती. पण तब्बल 14 दिवसानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबत लग्न तुटल्याची माहिती दिली होती. तिच्या पोस्टनंतर पलाशने देखील लग्न तुटल्याची पोस्ट शेअर केली होती.
advertisement
दरम्यान या सगळ्या घटनेनंतर आता स्मृती मानधना पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. स्मृती मानधनाच आज राजधानी दिल्लीला पोहोचली होती. इथे एका ठिकाणी तिची भेट कर्णधार हरमनप्रीत कौर आणि तिच्या मॅनेजरसोबत झाली होती.यावेळी स्मृतीने हरमनप्रीतला पाहून स्मितहास्य केलं आणि तिची गळाभेट घेतली होती.खरं तर स्मृती आणि हरमनप्रीत कौर अॅमेझॉनच्या संभव समिटला होत्या. जो भारत मंडपमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समिटच्या बाहेरच दोघांची भेट झाली होती. या दरम्यान माध्यमांनी तिला कॅमेरात कैद केले होते.
"मला वाटत नाही की क्रिकेटपेक्षा मला दुसरे काहीही आवडते. भारताची जर्सी घालणे ही सर्वात मोठी प्रेरणा आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असलात तरी, हा एक विचार तुम्हाला सर्वकाही रोखण्यास मदत करतो, असे स्मृती मानधना या कार्यक्रमात बोलली आहे.तसेच "फलंदाजीचे वेड नेहमीच होते. माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते खरोखर समजले नाही, परंतु माझ्या डोक्यात मला फक्त एकच गोष्ट हवी होती - विश्वविजेता म्हणून ओळखले जावे, असे ती सांगते.
"ही ट्रॉफी आमच्या संघर्षाचे फलित होती. मी एका दशकाहून अधिक काळ खेळलो आहे आणि बऱ्याचदा गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत. अंतिम सामन्यापूर्वी आम्ही तो क्षण पुन्हा पुन्हा चित्रित केला. जेव्हा तो अखेर पडद्यावर दिसला तेव्हा त्याने खरोखरच आमचे डोळे भरून आले. तो प्रत्येक प्रकारे भावनिक होता." हा प्रसंग आणखीनच भारावून गेला कारण दिग्गज मिताली राज आणि झुलन गोस्वामी स्टँडवरून पाहत होत्या असे स्मृती मानधनाने सांगितले.
