स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास अन् पलकची भेट
पलाश आणि स्मृती पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या व्हिडिओमुळे स्मृती आणि पलाशच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालं आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना हे मुंबईतील एका पॉश रेस्टॉरंटबाहेर दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल व तिचा पती मिथुन देखील स्पॉट झाले. या व्हिडिओमध्ये पलक मुच्छलने स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळालं.
advertisement
दोघांमधील जुने वाद मिटले
दरम्यान, दोन्ही कुटुंबांमधील ही जवळीक पाहून त्यांच्यातील जुने वाद मिटले असून आता पुन्हा एकदा लग्नाची बोलणी सुरू झाल्याचे तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर मात्र, या व्हिडीओमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. "सर्व खरं आहे का? पुन्हा लग्न होणार का?", तर काहींनी हा जुना व्हिडिओ असावा असा संशय व्यक्त केला आहे. "पलाशला दुसरी संधी दिल्याबद्दल स्मृती तुझे आभार," तर दुसऱ्याने लिहिले, "पलाश कसाही असला तरी पलक खूप चांगली आहे", असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
पलाशला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं?
स्मृती मानधनाचा जवळचा मित्र आणि अभिनेता-निर्माता विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडण्यात आले होते, असा खळबळजनक दावा माने याने केला आहे. इतकेच नाही तर, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाशला चोप दिला होता, असंही त्याने एका मुलाखतीत म्हटलं.
