पिचवरून मिळणाऱ्या असमान बाऊन्समुळे अपयश
बॅटिंग कोच एश्वेल प्रिन्स यांनी चक्क पिचलाच दोष दिला आहे. प्रिन्स यांच्या मते, पिचवरून मिळणाऱ्या असमान बाऊन्समुळे फलंदाजांना अपयश आले. जसप्रीत बुमराह याने उत्कृष्ट बॉलिंग करत 5 विकेट्स घेतले, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेची टीम अवघ्या दोन सत्रांत 159 रन्सवर ऑल-आऊट झाली. त्यावर बोलताना चवरून बाऊन्स असमान असेल याचे संकेत सुरुवातीलाच मिळाले होते. फलंदाज 20 किंवा 30 रन्स करून आत्मविश्वास वाढवण्याचा विचार करतात, पण इथं समान बाऊन्स नसल्यामुळे तो आत्मविश्वास फलंदाजांमध्ये आलाच नाही, असं बॅटिंग कोच म्हणालेत.
advertisement
क्रीजवर एक तास घालवल्यानंतर....
साऊथ अफ्रिकेची बॅटिंग पाहून माझा देखील विश्वास उडाला होता. क्रीजवर एक तास घालवल्यानंतरही तुम्ही त्या प्रकारचा आत्मविश्वास मिळवू शकला नाही, जो मिळणं आवश्यक होतं. टीम इंडियाला योग्य बाऊन्स मिळत होता. त्यामुळे त्यांनी अचूक बॉलिंग करत योग्य ठिकाणी टप्पे टाकले, असं साऊथ अफ्रिकेच्या कोचने सांगितलं आहे. त्यावेळी त्यांनी कबिसो रबाडा याच्या अनुपस्थितीवर देखील भाष्य केलं.
रबाडाची नक्कीच उणीव भासेल - बॅटिंग कोच
दरम्यान, रबाड हा एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो जगातील अव्वल दोन-तीन वेगवान गोलंदाजांमध्ये आहे. आम्हाला रबाडाची नक्कीच उणीव भासेल, असं मत प्रशिक्षक प्रिन्स यांनी मांडलं आहे. गौतम गंभीरने पीच स्पिनर्सला अनुकूल असावी, अशी इच्छा पीच क्युरूटरकडे केली होती. त्यामुळे देखील मोठा वाद झाला होता.
