TRENDING:

T20 World Cup : दोन भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमधून बाहेर केलं, रोहित-विराटचा हिशोब चुकता

Last Updated:

श्रीलंकेला या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून वर्ल्डकपमधून बाहेर काढण्यात दोन भारतीयांचा मोलाचा वाटा आहे. या दोन भारतीयांमुळे श्रीलंकेच्या खेळात सूधार झाला आणि ते सूपर 8 मध्ये पोहोचू शकले आहेत. त्यामुळे हे दोन भारतीय कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सोमवारी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव केला होता. या विजयानंतर श्रीलंका सूपर 8 मध्ये पोहचली आहे. दरम्यान श्रीलंकेला या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून वर्ल्डकपमधून बाहेर काढण्यात दोन भारतीयांचा मोलाचा वाटा आहे. या दोन भारतीयांमुळे श्रीलंकेच्या खेळात सूधार झाला आणि ते सूपर 8 मध्ये पोहोचू शकले आहेत. त्यामुळे हे दोन भारतीय कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
T20 World Cup
T20 World Cup
advertisement

खरं तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात पथुम निसांकाची नाबाद शतकीय खेळी आणि त्याच खेळाडूने मॅक्सवेलचा घेतलेला जबरदस्त कॅच टर्निंग पॉईंट ठरला होता. या दोन्ही क्षेत्रात श्रीलंकेच्या प्रशिक्षकाची जबाबदारी दोन भारतीय बजावत आहे. भारताचे विक्रम राडोठ हे श्रीलंकेचे बॅटींग कोच आहेत. त्यांनी श्रीलंकेला दिलेल्या प्रशिक्षणामुळेच आज ती सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. पथूम निसांकांच्या नाबाद शतकीय खेळीचं क्रेडिट देखील त्यालाच जातं. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यात विक्रम राठोड यांचा मोठा वाटा आहे.

advertisement

विक्रम राठोड सोबत भारताचे आर श्रीधर देखील श्रीलंकेच्या कोचिंग स्टाफमध्ये आहेत. आर श्रीधर हे श्रीलंकेचे फिल्डींग कोच आहेत.श्रीधर यांनी दिलेल्या फिल्डींग कोचिंगमुळेच काल पथूम निसांकाने मॅक्सवेलची खतरनाक कॅच घेतली.त्यामुळे या एका कॅचमुळे देखील मॅच फिरली होती.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला बाहेर करण्यात त्याचं मोठं योगदान होतं.

विक्रम राठोड आणि आर श्रीधर यांनी ही कामगिरी करून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हिशोब चुकता केला आहे. कारण ऑस्ट्रेलियाने 2023 ला भारताला फायनलमध्ये हरवले होते.त्यामुळे भारतीय टीमला अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे त्या पराभवाची सल दोघांच्या मनात होती. पण आता भारताच्या या दोन प्रशिक्षकांनी ऑस्ट्रे्लियाला स्पर्धेबाहेर करून रोहित शर्मा, विराट कोहलीचा हिशोब चुकता केला आहे.

advertisement

विशेष म्हणजे या सामन्यानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या यांनी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय दोन माजी भारतीय प्रशिक्षक आर. श्रीधर आणि विक्रम राठोड यांना दिले होते.

"आर. श्रीधर हे आमचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत; ते भारतातील आहेत. विक्रम (राठोड) आमचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. दोघेही खूप चांगले लोक आहेत. सरावादरम्यान आम्हाला जे काही हवे आहे ते ते करतात, जे क्षेत्ररक्षणासाठी खूप चांगले आहे. त्याच्या आयपीएल अनुभवामुळे, तो खेळाडूंसोबत चांगले काम करत आहे आणि संघात एकरूप झाला आहे. आम्ही फलंदाजांना खूप आत्मविश्वास दिला आहे. प्रशिक्षक म्हणून, आम्ही कधीकधी फलंदाजी युनिटबद्दल निराश होऊ शकतो, परंतु तरीही आम्ही खेळाडूंना आत्मविश्वास दिला. विक्रम आणि श्रीधर दोघेही खूप चांगले आहेत, असे जयसूर्या म्हणाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

त्यांनी संघाच्या मजबूत गोलंदाजीचेही कौतुक केले. पहिल्या आठ षटकांत १०० धावा दिल्यानंतर, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला रोखण्यासाठी त्यांच्या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागले. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराणाला दुखापत झाली असूनही, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना २० षटकांत १८१ धावांवर रोखले. "मला वाटतं आम्हाला हा संदेश द्यायचा होता की आपण चेंडूचा वेग बदलला पाहिजे आणि तो शक्य तितका कमी केला पाहिजे, आणि खेळपट्टीवर थोडी पकड होती, ज्याचा आम्हाला फायदा घ्यायचा होता. म्हणून मला वाटतं महेश थीकशन आणि इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मथिशा पाथिराणासोबत आमचा सामना कठीण गेला. पण पहिल्या काही षटकांनंतर आम्ही उत्तम पुनरागमन केले. महेश आला आणि त्याने तीन षटके टाकली. ते खूप महत्त्वाचं होतं. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली," तो म्हणाला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : दोन भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमधून बाहेर केलं, रोहित-विराटचा हिशोब चुकता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल