TRENDING:

Sunil Gavaskar : नाक खुपसण्याची गरज काय? टीम इंडियावर टीका करणाऱ्याची गावस्करांनी खडसावलं! म्हणाले 'तुमच्या देशात...'

Last Updated:

Sunil Gavaskar criticizes foreign pundits : जेव्हा त्यांच्या देशाची निवड होते, तेव्हा ते सहसा काहीही बोलत नाहीत. मग भारतीय संघाच्या निवडीमध्ये त्यांना नाक खुपसण्याची गरज काय? असा सवाल सुनील गावस्करांनी विचारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India team squad Selection : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले होते. खासकरून श्रेयस अय्यरला न घेतल्याने अनेकांनी टीका केली. त्यावर परदेशी खेळाडू आणि क्रिडातज्ज्ञांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली होती. अशातच टीम इंडियाच्या सिलेक्शनवर परदेशी खेळाडू आणि समालोचक करत असलेल्या टीकेवर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय क्रिकेटशी कोणताही संबंध नसताना आणि कमी माहिती असतानाही हे लोक या वादात उडी घेतात, हे आश्चर्यकारक असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे.
Sunil Gavaskar criticizes foreign pundits
Sunil Gavaskar criticizes foreign pundits
advertisement

गावस्कर म्हणाले की, "ते खेळाडू म्हणून कितीही महान असले किंवा भारतात कितीही वेळा आले असले, तरी भारतीय संघाची निवड हा त्यांचा विषय नाही. त्यांनी त्यांच्या देशाच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे आणि आम्हाला आमच्या क्रिकेटची चिंता करू द्यावी."

आपल्या लेखात त्यांनी परदेशी खेळाडूंच्या दुटप्पीपणावरही बोट ठेवले. "जेव्हा त्यांच्या देशाची निवड होते, तेव्हा ते सहसा काहीही बोलत नाहीत. मग भारतीय संघाच्या निवडीमध्ये त्यांना नाक खुपसण्याची गरज काय?" असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, भारतीय माजी क्रिकेटपटू इतर देशांच्या निवडीवर बोलत नाहीत, कारण आम्ही आमच्या कामाशी काम ठेवतो, असेही ते म्हणाले.

advertisement

सोशल मीडिया आणि नकारात्मकता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय आणि रासायनिकमध्ये फरक काय? कशी करावी शेती? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

परदेशी खेळाडूंच्या या वर्तनामागे सोशल मीडियाचे वाढते महत्त्व असल्याचेही गावस्कर यांनी सांगितले. व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेटवर नकारात्मक टिप्पणी करणे हा एक सोपा मार्ग बनला आहे. यामुळे भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून मोठी प्रतिक्रिया मिळते आणि त्यातून त्यांचे फॉलोअर्स वाढतात. "याच कारणामुळे अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटप्रेमींना चिडवून आपले नाव कमावले आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar : नाक खुपसण्याची गरज काय? टीम इंडियावर टीका करणाऱ्याची गावस्करांनी खडसावलं! म्हणाले 'तुमच्या देशात...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल