TRENDING:

Sunil Gavaskar : कंठ दाटला, डोळ्यात पाणी... गावसकरांना अश्रू अनावर, स्टेजवर काय घडलं? Video

Last Updated:

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर माजी भारतीय कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टर यांना सन्मानित करताना भावुक झाले, एवढंच नाही तर गावसकरांचे डोळेही पाणावले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर माजी भारतीय कर्णधार नारी कॉन्ट्रॅक्टर यांना सन्मानित करताना भावुक झाले, एवढंच नाही तर गावसकरांचे डोळेही पाणावले. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका अवॉर्ड समारोहात हा इमोशनल क्षण पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 92 वर्षांच्या नारी कॉन्ट्रॅक्टर यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला.
कंठ दाटला, डोळ्यात पाणी... गावसकरांना अश्रू अनावर, स्टेजवर काय घडलं? Video
कंठ दाटला, डोळ्यात पाणी... गावसकरांना अश्रू अनावर, स्टेजवर काय घडलं? Video
advertisement

'माझ्यासाठी हा खूपच सन्मानाचा क्षण आहे, कारण मी नारी भाईंना पुरस्कार देत आहे. आम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. खासकरून ओपनिंग बॅटर म्हणून साहस काय असतं, हे आम्ही नारी भाईंकडून शिकलो', असं गावसकर म्हणाले.

कॉन्ट्रॅक्टरच्या सल्ल्याने करिअरला कलाटणी

नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी मला खास सल्ला दिला होता, ज्यामुळे माझ्या करिअरला कलाटणी मिळाली. जेव्हा तुम्ही चांगले खेळाल, त्या दिवशी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट डायरीमध्ये लिहा. सकाळी उठल्यापासून मैदानात पोहोचेपर्यंत सगळं काही लिहा. खेळाडू जेव्हा खराब काळातून जातो, तेव्हा तो ही डायरी वाचून स्वत:चा आत्मविश्वास वाढवू शकतो, असं नारी कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं होतं.

advertisement

गावसकरांनी या पुरस्कार सोहळ्यात 1959 च्या लॉर्ड्स टेस्टचा एक किस्सा सांगितला, ज्यामुळे ते बरे प्रेरित झाले. या सामन्यात इंग्लंडचे फास्ट बॉलर ब्रायन स्टॅथम यांचा बॉल नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या छातीला लागला आणि त्यांची बरगडी तुटली. तरीही नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी बॅटिंग केली आणि 81 रन केले, असं गावसकर यांनी सांगितलं.

नारी कॉन्ट्रॅक्टर यांना भारतीय क्रिकेटमधल्या साहसी खेळाडूंपैकी एक मानलं जातं. नारी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म 7 मार्च 1934 रोजी गुजरातच्या गोधरामध्ये झाला. डावखुरे ओपनिंग बॅटर असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांनी 1955-62 मध्ये भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळलं. भारतासाठी त्यांनी 31 टेस्टमध्ये 31.58 च्या सरासरीने 1611 रन केले. कॉन्ट्रॅक्टर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकंही केली.

advertisement

नारी कॉन्ट्रॅक्टर भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात तरुण कर्णधारांपैकी एक आहेत. 1960-61 साली 26 वर्षांचे असताना नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या नेतृत्वात 1961-62 साली भारताने इंग्लंडच्या जमिनीवर त्यांचाच 2-0 ने पराभव केला. भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा पहिला टेस्ट सीरिज विजय होता.

बरगडी तुटली तरी बॅटिंग केली

1962 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावेळी बारबाडोसमध्ये एका टूर मॅचवेळी नारी कॉन्ट्रॅक्टर यांना गंभीर दुखापत झाली. फास्ट बॉलर चार्ली ग्रिफिथ यांचा बाऊन्सर कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्याला लागला. ही दुखापत इतकी गंभीर होती की नारी कॉन्ट्रॅक्टर यांचं करिअर संपलं. आयुष्यासाठी धोका ठरलेल्या या दुखापतीतून बरे झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर यांनी पुन्हा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलं. नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी 138 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 39.86 च्या सरासरीने 8,611 रन केले, ज्यात 22 शतकांचा समावेश आहे. 1970-71 च्या रणजी ट्रॉफीमध्ये नारी कॉन्ट्रॅक्टर यांनी गुजरातच्या टीमचं नेतृत्वही केलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

नारी कॉन्ट्रॅक्टर हे सध्या मुंबईमध्ये राहतात आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अकॅडमीमध्ये युवा खेळाडूंना कोचिंग देतात. भारतीय क्रिकेटमधल्या योगदानाबद्दल नारी कॉन्ट्रॅक्टर यांना कर्नल सीके नायडू लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sunil Gavaskar : कंठ दाटला, डोळ्यात पाणी... गावसकरांना अश्रू अनावर, स्टेजवर काय घडलं? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल