पाकिस्तान संघावर टीकेची झोड
सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानवर टीका करण्याची संधी कधी सोडली नाही. पाकिस्तान क्रिकेटमधील उणिवा अनेकदा त्यांनी दाखवून दिल्या आहेत. अशातच पाकिस्तानला भारताविरुद्घ खास कामगिरी करता आली नाही. त्यामळे आता लिटिल मास्टर गावस्कर यांनी पाकिस्तान संघावर टीकेची झोड उठवली. त्यांनी यावेळी 1960 च्या पाकिस्तानी संघाचा दाखला दिला.
advertisement
नेमकं काय म्हणाले सुनील गावस्कर?
मला आठवतं, मी चर्चगेटहून ब्रेबॉर्न स्टेडियमकडे धावत जायचो, फक्त हनीफ मोहम्मद यांना फलंदाजी करताना पाहण्यासाठी, मी धावत धावत जात होतो. तो एक काळ होता. पण त्या काळापासून आजवर मी अशी पाकिस्तानची टीम पाहिलेली नाही, जी आत्ताची आहे. ही पाकिस्तानची पोपट टीम आहे. 1960 नंतर पहिल्यांदाच मी पाकिस्तानची अशी परिस्थिती पाहतोय, असं म्हणत सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.
कसा रंगला सामना?
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेऊन त्याला चांगली साथ दिली. तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. ओपनर अभिषेक शर्माने 13 बॉलमध्ये 31 रनची जलद खेळी करत भारताचा विजय सोपा केला. कॅप्टन सूर्यकुमार यादवने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने नाबाद 47 रनची महत्त्वाची खेळी केली. तर तिलक वर्माने 31 बॉलमध्ये 31 रन काढून त्याला चांगली साथ दिली. अखेरीस सूर्यकुमार यादवने मॅचच्या 16 व्या ओव्हरमध्ये सिक्स मारून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.