इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याने सुनिल गावसकर यांच्यासाठी खास केक बनवला होता. मी टेस्ट मॅच खेळत असताना किंवा कॉमेंट्री करत असताना, मी इतके वेळा इंग्लंडला आलो आहे, कधीही माझा वाढदिवस आला नव्हता, त्यामुळे हा दिवस खूपच खास आहे, अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली आहे.
भारतीय खेळाडू बर्थडे सेलिब्रेशन करताना केक तोंडावर लावतात, असं मी आयपीएलमध्ये बघितलं आहे. तुम्हालाही असंच सेलिब्रेशन करायचं आहे का? असा प्रश्न मायकल वॉनने गावसकरांना विचारला, ज्यावर गावसकरांनी नाही असं उत्तर दिलं. पुढे केक कापण्यासाठी मायकल वॉनने गावसकरांना चाकू दिला, पण यानंतर गावसकरांनी मायकल वॉनला भारतीय संस्कृती सांगितली.
advertisement
भारतामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातात चाकू देत नाही, त्यामुळे चाकू टेबलवर ठेव, मी तो उचलतो, असं गावसकरांनी मायकल वॉनला सांगितलं, त्यानंतर मायकल वॉनने चाकू टेबलवर ठेवला. हा चाकू गावसकरांनी उचलला आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापला. सुनिल गावसकर यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच अनेक जण गावसकर यांचं भारतीय संस्कृतीची आठवण ठेवल्याबद्दल कौतुक केलं आहे.
भारताच्या अनेक भागांमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याच्या हातात चाकू किंवा कात्री देत जात नाही, तर त्याऐवजी चाकू आणि कात्री खाली ठेवून दुसऱ्या व्यक्तीला घ्यायला सांगितली जाते. चाकू किंवा कात्री हातात दिल्याने दोन व्यक्तींमध्ये वाद आणि भांडणं होतात, असं मानलं जातं.
