गावस्करांना मिडल ऑर्डरची चिंता
भारत पाकिस्तान आशिया कप फायनल मॅचपूर्वी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, गावसकर यांनी शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. असे अनेक प्रमुख खेळाडू आहेत जे स्कोरमध्ये फरक निर्माण करू शकतात. सूर्यकुमार यादव अजून धावा करण्यासाठी उत्सुक असेल, तसेच तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या देखील मोठी खेळी करण्यासाठी तयार आहेत, असं म्हणत गावस्कर यांनी विश्वास व्यक्त केलाय.
advertisement
अभिषेक शर्मा शतक ठोकणार?
शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली आहे, पण आम्ही त्याच्याकडून अलीकडे जी मोठी धावसंख्या अपेक्षित करतो ती अजून आलेली नाही. आमच्याकडे भरपूर फलंदाजीची ताकद शिल्लक आहे, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. असंही गावस्कर म्हणतात. विशेषतः अभिषेक शर्माला आता संधी सोडायची नाही. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि धावबाद झाल्यामुळे त्याचं शतक हुकलं असली तरी, तो आणखी एका मोठ्या खेळीसाठी कदाचित तीन आकडी स्कोरसाठी प्रयत्न करेल, असं मत देखील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
पाकिस्तानला वॉर्निंग
दरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक करत सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानला वॉर्निंग दिली आहे. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन हे फलंदाज पाकिस्तानवर कोणत्याही परिस्थितीत घातक ठरू शकतात, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.