पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध दोन मुद्द्यांवर तक्रार दाखल केली होती. पहिला मुद्दा म्हणजे पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सुर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम भारताच्या सैन्य दलाला समर्पित केला होता. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुर्याचे हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हणत तक्रार दाखल केली होती. याव्यतिरिक्त, पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल सूर्यकुमार यादवविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
advertisement
पाकिस्तानच्या या तक्रारीनंतर आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सूर्यकुमार यादव यांची सुनावणी 25 सप्टेंबरला पार पडली आहे.आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामनाधिकारी 26 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी यावर अंतिम निर्णय देणार आहेत.
कारवाई होणार का?
पीसीबीची तक्रार निरर्थक आहे... हे लक्षात घ्यावे की भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यातील विजय पहलगाम हल्ल्यातील बळी आणि भारतीय सैन्याला समर्पित केला. हे एक भावनिक विधान होते आणि पीसीबीने जाणूनबुजून दिशाभूल केली. शिवाय, आयसीसीच्या नियमावलीत हस्तांदोलन अनिवार्य असल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे, सूर्यकुमार यादवला कोणतीही शिक्षा होण्याची शक्यता कमी आहे.
पाकिस्तानच्या दोन खेळाडूंवरही सुनावणी होणार
बीसीसीआयने देखील पाकिस्तानी खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती.या तक्रारीत म्हटले आहे की, भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी चिथावणीखोर हावभाव आणि वादग्रस्त वर्तन केले. हरिस रौफने विमान अपघातासारखे हावभाव केले आणि भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना शिवीगाळ केली. साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर "बंदुकीने सेलिब्रेशन" केले.
सूर्यकुमार यादवप्रमाणेच साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनीही आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानी खेळाडूंसोबत सामनाधिकारींची सुनावणी 26 सप्टेंबर (शुक्रवार)ला होणार आहे. जर साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्यावरील आरोप खरे ठरले तर त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते, कारण खेळाडू मैदानावर खेळाच्या भावनेविरुद्ध हावभाव करू शकत नाहीत.