"ओयय जस्सी...घर की याद नहीं आई..."
मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव करून विजयाचं खातं उघडलं होतं. अशातच आता मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याला कारण सूर्यकुमार यादव... सूर्याने ड्रेसिंग रुमचं वातावरण पहिल्या दिवसापासून हलकं फुलकं ठेवलंय. जसप्रीत बुमराहचं जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये आगमन झालं तेव्हा सूर्याने बुमराहला डायलॉग मारला होता. "ओयय जस्सी...घर की याद नहीं आई...", हा धुरंधर 2 मधला डायलॉग बोलून सूर्यकुमारनं जसप्रीत बुमराहचं स्वागत केलं होतं. अशातच सूर्याने धुरंधर स्टाईलमध्ये एन्ट्री केलीये.
advertisement
रहमान डकैतच्या स्टाईलने एन्ट्री
मुंबई इंडियन्सनं एक व्हिडीओ शेअर केलाय, त्या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव एका कार्यक्रमात स्टेजवर एन्ट्री करताना 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नान म्हणजेच रहमान डकैतची हुक स्टेप केली. सूर्याला स्टेजवर बोलवलं जात होतं, एका संगीत कार्यक्रमाला सूर्याने हजेरी लावली होती. त्यावेळी गाणं वाजताच सूर्याने रहमान डकैतच्या स्टाईलने एन्ट्री केली अन् सर्वांचं मन जिंकलं. त्याच्या या व्हिडीओची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
जर सूर्या इम्पॅक्ट प्लेयर नसेल तर मग कोण?
दरम्यान, पहिल्या आयपीएल सामन्यात सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवलं होतं. त्याला काहीसा दुखापतीचा सामना करावा लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. अशातच आता सूर्याला आगामी सामन्यात देखील हीच भूमिका बजावावी लागू शकते. जर सूर्या इम्पॅक्ट प्लेयर नसेल तर ही भूमिका कुणाला दिली जाईल, हा मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा वळगता चौथा प्लेयर कोण? जो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळेल, असा सवाल विचारला जात आहे.
