वेल्लालागेच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका
अशिया कपमधील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यावेळी श्रीलंकेचा स्टार स्पिनर दुनिथ वेल्लालागे (Dunith Wellalage Father Passes Away) याच्या वडिलांचं निधन झालं होतं. 18 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धचा ग्रुप बीची मॅच सुरू असताना वेल्लालागे याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा जीव वाचवता आला नव्हता.
advertisement
सूर्याने जादूकी झप्पी दिली
या घटनेनंतर वेल्लालागे तातडीने श्रीलंकेला रवाना झाला होता. अशातच आता टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने सामना झाल्यावर वेल्लालागे याची मैदानावर भेट घेतली आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. सूर्याने वेल्लालागे याचा कॉन्फिडेन्स वाढावा यासाठी काही मोलाचे सल्ले दिले. त्यानंतर सूर्याने त्याला जादूकी झप्पी दिली. त्यानंतर वेल्लालागे याच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचं दिसून आलं.
पाहा Video
श्रीलंकन फॅन्स स्टेडियममध्ये उपस्थित
दरम्यान, श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध 170 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर थोड्याच वेळात दुनिथला त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तो श्रीलंकेला रवाना झाला होता. तसेच दोन दिवसानंतर तो पुढची मॅच खेळण्यासाठी लगेच माघारी देखील आला होता. त्यानंतर त्याला सपोर्ट करण्यासाठी असंख्य श्रीलंकन फॅन्स स्टेडियममध्ये उपस्थित होते.