भावा, निवृत्तीचा विचार आता...
यावेळी 35 वर्षाच्या कॅप्टन सूर्याला एका पत्रकाराने निवृत्तीवर प्रश्न विचारला. प्रश्न ऐकून सूर्यकुमार यादव काहीसा बुचकाळ्यात पडला. सूर्यकुमारने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आहेत. सूर्याने हसत हसत उत्तर दिलं की, "भावा, निवृत्तीचा विचार आता कशाला करायचा? सर्व काही तर व्यवस्थित सुरू आहे.", असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
advertisement
मी सध्या तरी कुठंही जाणार नाहीये
सूर्यकुमार यादवने फायनलनंतर बोलताना स्पष्ट केलं की, मी सध्या तरी कुठंही जाणार नाहीये. माझं मुख्य लक्ष आता ऑलिम्पिक मेडलवर आणि आगामी 2028 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी 2024 मध्ये निवृत्ती घेतल्यावर ही नवीन टीम तयार झाली होती. आता सूर्या पुन्हा नव्या छाव्यांसह टीमला पुढे नेण्यासाठी सज्ज आहे.
आम्ही खूप 160-170 क्रिकेट खेळलो पण...
दरम्यान, भारतीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापासून आपण महत्त्वाचे टप्पे साजरे करत आहोत. महत्त्वाचे टप्पे महत्त्वाचे नसतात, ट्रॉफी महत्त्वाच्या असतात. आपण ट्रॉफी साजरे करायला सुरुवात केली पाहिजे, असं गौतम गंभीर यावेळी म्हणाला. तसेच त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक देखील केलं. आम्ही खूप 160-170 क्रिकेट खेळलो आहोत. मला या संघाने तो सामना खेळावा असं वाटत नव्हतं, त्याऐवजी आम्हाला एक निर्भय, उच्च जोखीम आणि उच्च बक्षीस असलेला खेळ खेळायचा होता, असं म्हणत गंभीरने गेम प्लॅन सांगितला.
