सूर्यकुमार यादव आशिया कपसाठी पूर्णपणे फिट झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. हर्णियाच्या ऑपरेशननंतर सूर्यकुमार यादवची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, तसंच त्याने बॅटिंगलाही सुरूवात केली आहे. सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट व्हायच्या शेवटच्या टप्प्यावर आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवच्या फिटनेसमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये तो फिल्डिंग प्रॅक्टिस आणि जलद धावायच्या ट्रेनिंगला सुरूवात करेल. आशिया कपपर्यंत सूर्यकुमार यादव 100 टक्के फिट होईल. तसंच तो निवड समिती आणि प्रशिक्षकांच्याही संपर्कात आहे.
advertisement
सूर्या टी-20 चा मास्टर
सूर्यकुमार यादव हा टी-20 चा मास्टर आहे. भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा सूर्या एकट्याच्या जीवावर मॅचचं चित्र बदलू शकतो. भारतामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून आशिया कपकडे पाहिलं जात आहे, त्यामुळे सूर्यकुमार यादवचं फक्त फिट असणंच नाही तर तो चांगल्या फॉर्ममध्ये असणंही टीम इंडियासाठी गरजेचं आहे.