मॅच फायनलसारखी वाटली, सुर्याचा पाकड्यांना टोला
सूर्यकुमार यादव मॅचनंतर म्हणाला, "ही मॅच एका फायनलसारखी वाटली. पहिल्या हाफनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये मुलांनी खूप मोठा खेळ दाखवला. मी फक्त बॉईजला एवढंच सांगितलं होतं की, 'एनर्जी चांगली ठेवा आणि मॅचच्या शेवटी आपण कुठे आहोत, ते पाहू.' आमचे बॅटिंगमधील स्टार्ट खूप चांगले होते आणि संजू सॅमसन व तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंनी तो टेम्पो कायम ठेवला, हे पाहून छान वाटले."
advertisement
अर्शदीप सिंगवर पूर्ण विश्वास - सूर्यकुमार यादव
सुपर ओव्हरमध्ये अचूक बॉलिंग करणाऱ्या अर्शदीप सिंगवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सूर्यकुमारने सांगितलं. "अर्शदीप गेल्या दोन-तीन वर्षांपासून आमच्यासाठी सातत्याने चांगला परफॉर्म करत आहे. मी त्याला फक्त त्याच्या प्लॅन्सवर विश्वास ठेवून ते अंमलात आणायला सांगितलं. तो अशा परिस्थितीत अनेकदा बॉलिंग करायला उतरला आहे आणि त्याने नेहमीच चांगले यश मिळवलं आहे. त्याचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो. सुपर ओव्हरसाठी अर्शदीपशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नव्हता," असं सूर्याने स्पष्ट केलं आहे.
सूर्याचा पाकिस्तानला इशारा
दरम्यान, आजच्या सामन्यात दोन तीन जणांना क्राम्पचा खूप त्रास झाला, पण उद्या आम्ही रिकव्हरीचा दिवस ठेवू आणि फायनलमध्येही आजच्यासारख्याच उत्साहाने उतरू, असं म्हणत सूर्याने पाकिस्तानला चॅलेंज दिलं आहे. ग्रुप स्टेजमधून (Group Stage) आम्हाला जे काही हवे होते, ते सर्व मिळाले आहे आणि फायनलमध्ये पोहोचल्याचा आम्हाला आनंद आहे, असं म्हणत सूर्याने पाकिस्तानचं नाव न घेता इशारा दिला आहे.