आयपीएलनंतर सध्या मुंबई टी20 लीग सूरू आहे. या लीगमध्ये ट्रायम्फ नाईटस या संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव आहे. सुर्याच्या संघाचा या लीगमधला हा तिसरा सामना आहे. बाकी दोन सामन्यात सुर्याची बॅट चांगलीच तळपली होती. मात्र आज सोबो मुंबई फाल्कन विरूद्धच्या सामन्यात तो अवघा एक धावा करून बाद झाला होता. त्यामुळे संघाची अवस्था बिकट झाली होती.
advertisement
अशा परिस्थितीत पंजाब किंग्जचा सुर्यांश शेडगे सुर्याच्या मदतीला आला आहे. त्याने वानखेडेच्या मैदानावर वादळी खेळी केली आहे. सुर्यांशने 21 बॉलमध्ये 49 धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. या दरम्यान त्याने 233.33च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यामुळे सुर्याच्या संघाचा डाव सावरला होता.
सुर्यांश शेडगे सोबत सिद्धार्थ आढतरावने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर सूर्याच्या ट्रायम्फ नाईटस संघाने 5 विकेटस गमावून 145 धावा केल्या आहेत.त्यामुळे आता सोबो मुंबईसमोर 146 धावांचे आव्हान आहे.