पाकिस्तानच्या या बहिष्काराच्या भूमिकेनंतर आयसीसीचं आणि पाकिस्तानच मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आयसीसी पाकिस्तानवर दंडासोबत मोठी कारवाई करण्याच्या विचारात आहे.कारण आयसीसी स्पर्धेत ज्या ज्या भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येतात. त्या त्या वेळी आयसीसीला जवळपास 250 मिलियन डॉलर म्हणजेच (2200 करोड हून अधिक) महसूल मिळतो.
काही मिडीयी रिपोर्टमध्ये हा महसूल 3000 करोड हून अधिक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत जर हा सामना पार पडला नाही. तर प्रायोजकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.पाकिस्तानची वर्षभराची कमाई जवळपास 35-45 डॉलर म्हणजेच 300 ते 400 करोड.यामध्ये आयसीसीकडून मिळणार उत्पन्न, पीएसएलची कमाई, सामन्यांचे तिकीटांची कमाई असं सगळंच आलं.त्यामुळे पाकिस्तानला भरपाई द्यायची झाली तर 7 वर्ष लागणार आहे.त्यामुळे हे आर्थिक संकट पाकिस्तान झेलू शकत आणि त्यांच्याकडे माघार घेण्याशिवाय पर्याय नाही.
advertisement
दरम्यान या वादात टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर.अश्विनने भारत पाकिस्तान सामने होतील,असा विश्वास व्यक्त केला आहे. ''100 टक्के, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. मला वाटते की ते होईल. पुढील 3-4 दिवसांत हा निर्णय मागे घेण्यात येईल,हा माझा अंदाज आहे,असे आर अश्विन त्याच्या 'अॅश की बात' या त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला आहे. तसेच मला भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे कारण त्यात व्यावसायिक निर्णय गुंतलेले आहेत,असे देखील अश्विनने सांगितले आहे.
दरम्यान आता अश्विनला जो विश्वास वाटतो आहे, तो खरंच खरा ठरतो का? हे येत्या काही दिवसात कळणार आहे.
