पीसीबीने कोणता निर्णय घेतला?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या सर्व अफवांना पूर्णविराम दिला असून स्पर्धेतून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. 'रेवस्पोर्ट्स'ने दिलेल्या अहवालानुसार, बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तान वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणार असल्याच्या बातम्या फेटाळून लावण्यात आल्या आहेत. पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं की, माघार घेण्याचा असा कोणताही निर्णय बोर्डाचा नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ नियोजित वेळापत्रकानुसार या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
advertisement
2025 चा करार पाकिस्तानला फायद्याचा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामागे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण आहे. 2025 च्या सुरुवातीला झालेल्या करारानुसार, पाकिस्तान आपले सर्व वर्ल्ड कप मॅच श्रीलंकेत खेळणार आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात न गेल्यामुळे हा तोडगा काढण्यात आला होता. आता पाकिस्तानला भारतात प्रवास करण्याची गरज नसल्यामुळे, स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही सबळ कारण उरलेलं नाही.
गलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) नाराज
पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आयसीसीसोबतच्या वादात पाकिस्तानकडे राजनैतिक आणि क्रिकेटच्या मैदानावरील पाठिंबा मागितला होता. कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) नाराज झाले होते. या वादातूनच बांगलादेशने आपल्या वर्ल्ड कपमधील सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे.
आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी
दरम्यान, बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी घातली आहे. बांगलादेशचे गट साखळीतील सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत, परंतु तिथल्या सुरक्षेबाबत बीसीबीने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, लोकांकडून केवळ विषयाला हवा देण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत आणि पाकिस्तान आपले सामने खेळण्यासाठी सज्ज आहे.
