पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 4 कॅच सोडले होते. यातले 2 कॅच तिलक वर्मा, एक कॅच इशान किशन आणि एक कॅच कुलदीप यादवने सोडला. आता नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्येही कॅचवरून मोठा ड्रामा झाला.
20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला शिवम दुबेच्या बॉलिंगवर झॅक लायन याने हवेत शॉट मारला, त्यानंतर रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव कॅच पकडण्यासाठी धावले. सूर्याने मी कॅच पकडत आहे, मध्ये येऊ नको, असं रिंकूला स्पष्टपणे सांगितलं, तरी रिंकू मध्ये आला. या गोंधळामध्ये सूर्यकुमार यादवच्या छातीला बॉल लागला. बॉल लागल्यानंतर सूर्या छातीला हात लावून लागलं का नाही ते पाहत होता. मॅच संपल्यानंतरही सूर्याने छातीला दुखापत तर झाली नाही ना? हे पाहिलं.
advertisement
सूर्याच्या कॅचवरून ड्रामा झाल्यानंतर पुढच्याच बॉलला तिलक वर्माने आणखी एक कॅच सोडला. सुदैवाने टीम इंडियाला सुटलेल्या या दोन कॅचची मोठी किंमत मोजावी लागली नाही, पण सुपर-8 मध्ये मात्र अशी फिल्डिंग टीम इंडियाला गोत्यात आणू शकते.
वरुणची भेदक बॉलिंग
या सामन्यात टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या. याशिवाय शिवम दुबेला 2 आणि बुमराह-हार्दिकला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. तर बॅटिंगमध्ये शिवम दुबेने आक्रमक बॅटिंग केली, त्याने 31 बॉलमध्ये 212.90 च्या स्ट्राईक रेटने 66 रन केले, ज्यात 6 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. अर्धशतक आणि त्यानंतर घेतलेल्या 2 विकेटमुळे दुबेला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
