पाकिस्तानची टीमने भारतामध्ये खेळायला नकार दिल्यामुळे त्यांचे सगळे सामने हे कोलंबोमध्ये होत आहेत, त्यामुळे टीम इंडियालाही एका सामन्यासाठी कोलंबोला जावं लागलं. कोलंबोमध्ये टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंडही त्याच्यासोबत दिसली आहे, त्यामुळे हार्दिक पांड्याने बीसीसीआयचा आदेश धुडकावला का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
टीम इंडिया कोलंबोहून भारतात यायला निघाली तेव्हा एअरपोर्टवर हार्दिक पांड्यासोबत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा होती. याआधी माहिका शर्मा हार्दिक पांड्यासोबत टीम हॉटेलमध्येही दिसली होती.
advertisement
बायको-गर्लफ्रेंडसाठी बीसीसीआयचा नियम
भारतीय टीम मॅनेजमेंटने वर्ल्ड कपदरम्यान खेळाडूंना त्यांची पत्नी अथवा गर्लफ्रेंडसोबत प्रवास करायला परवानगी द्या, अशी विनंती बीसीसीआयकडे केली होती, पण बीसीसीआयने खेळाडूंची ही विनंती मान्य केली नाही. सध्याच्या नियमांनुसार, टीम इंडियाचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी कुटुंबियांना सोबत आणण्याची परवानगी आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने नवीन धोरण तयार केलं, यात परदेश दौऱ्यांवर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीबाबत कालमर्यादा निश्चित केली गेली. टीमचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त असेल तर खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी त्यांच्या कुटुंबाला सोबत आणण्याची परवानगी बीसीसीआयने दिली होती.
टी-20 वर्ल्ड कप हा एका महिन्याच्या कालावधीचा आहे, त्यामुळे खेळाडूंच्या पार्टनरना टीमसोबत राहण्याला परवानगी नाही, तरी हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने टीमसोबत प्रवास कसा केला? असा प्रश्न विचारला जात आहे.
