TRENDING:

Pakistan : 'फालतूगिरी चालणार नाही, चालता हो...', पाकिस्तानच्या कोच-कॅप्टनची जुंपली, डग आऊटमध्ये राडा, Video

Last Updated:

पाकिस्तान-नामिबिया यांच्यातल्या सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या डग आऊट मधला एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात कर्णधार सलमान आघा आणि कोच माईक हेसन यांच्यात वाद सुरू असल्याचं दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो : नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा 102 रननी विजय झाला आहे. पाकिस्तानने दिलेलं 200 रनचं आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या नामिबियाचा 17.3 ओव्हरमध्ये फक्त 97 रनवर ऑलआऊट झाला. साहिबझादा फरहान आणि उस्मान तारिक पाकिस्तानच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. साहिबझादा फरहानने 58 बॉलमध्ये नाबाद 100 रनची खेळी केली तर उस्मान तारिकने 3.3 ओव्हरमध्ये 1 ओव्हर मेडन टाकून 16 रन देत 4 विकेट घेतल्या.
'फालतूगिरी चालणार नाही, चालता हो...', पाकिस्तानच्या कोच-कॅप्टनची जुंपली, डग आऊटमध्ये राडा, Video
'फालतूगिरी चालणार नाही, चालता हो...', पाकिस्तानच्या कोच-कॅप्टनची जुंपली, डग आऊटमध्ये राडा, Video
advertisement

भारताविरुद्ध 61 रननी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला नामिबियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं होतं. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला असला तरी त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. पाकिस्तान-नामिबिया यांच्यातल्या सामन्या दरम्यान पाकिस्तानच्या डग आऊट मधला एक व्हिडिओ समोर आला आहे.

पाकिस्तानच्या बॅटिंगची 14 वी ओव्हर सुरू असताना डग आऊटमध्ये कर्णधार सलमान अली आघाने त्याच्या हातात असलेली बॉटल रागाने फेकली, तेव्हा पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन हे संतापले आणि सलमान आघाला पाहून काहीतरी म्हणाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग हा स्पष्टपणे दिसत होता. सलमान आघा बॉटल फेकताना त्याच्या बाजूला बाबर आझम बसला होता.

advertisement

या सामन्यामध्ये पाकिस्तानने बाबर आझमला टीममध्ये घेतलं, पण त्याला बॅटिंगलाच पाठवलं नाही. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहान आणि सॅम अयुब ओपनिंगला आले, तर तिसऱ्या क्रमांकावर सलमान आघा, चौथ्या क्रमांकावर ख्वाजा नाफे आणि पाचव्या क्रमांकावर शादाब खान बॅटिंगला उतरला. भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम खराब शॉट खेळून आऊट झाला, त्याचीच शिक्षा म्हणून नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊनही बॅटिंगला पाठवलं नसल्याची चर्चा रंगली आहे.

advertisement

पाकिस्तान सुपर-8 मध्ये

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

नामिबियाविरुद्ध विजय मिळवताच पाकिस्तानचा सुपर-8 मध्ये प्रवेश झाला आहे. सुपर-8 मध्ये पाकिस्तानच्या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेची टीम आहे. सेमी फायनलला प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला या 3 पैकी कमीत कमी 2 मॅच तरी जिंकाव्या लागणार आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan : 'फालतूगिरी चालणार नाही, चालता हो...', पाकिस्तानच्या कोच-कॅप्टनची जुंपली, डग आऊटमध्ये राडा, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल