TRENDING:

T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे अंपायर ठरले, टीम इंडियासाठी 'अनलकी' मैदानात उतरणार का नाही?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे सामने 4 आणि 5 मार्चला खेळवण्यात येणार आहेत. या नॉक आऊट सामन्यांसाठी अंपायरची घोषणा करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे सामने 4 आणि 5 मार्चला खेळवण्यात येणार आहेत. या नॉक आऊट सामन्यांसाठी भारताच्या नितीन मेनन यांचा सामना अधिकाऱ्यांच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात होणार आहे. त्यानंतर 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडेल. दोन सेमी फायनलमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे अंपायर ठरले, टीम इंडियासाठी 'अनलकी' मैदानात उतरणार का नाही?
T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे अंपायर ठरले, टीम इंडियासाठी 'अनलकी' मैदानात उतरणार का नाही?
advertisement

पहिल्या सेमी फायनलसाठी अंपायर

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमी फायनलसाठी इंग्लंडचे माजी स्पिन बॉलर रिचर्ड इलिंगवर्थ आणि माजी फास्ट बॉलर अॅलेक्स व्हार्फ मैदानी अंपायर असतील. भारताचे अनुभवी नितीन मेनन हे थर्ड अंपायर असतील, तर रॉड टकर हे फोर्थ असतील. माजी भारतीय फास्ट बॉलर जवागल श्रीनाथ हे मॅच रेफ्री असतील.

advertisement

भारताच्या सामन्यासाठी अंपायर कोण?

मुंबई येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी आणि दक्षिण आफ्रिकेचे अल्लाहुद्दीन पालेकर मैदानावर अंपायर म्हणून काम पाहतील. दक्षिण आफ्रिकेचे एड्रियन होल्डस्टॉक हे थर्ड अंपायर असतील, तर पॉल रायफल फोर्थ अंपायर म्हणून काम पाहतील. अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफ्री असतील. टीम इंडियासाठी अनलकी समजले जाणारे रिचर्ड कॅटलब्रो हे दोन्ही सेमी फायनलसाठी अंपायर नसतील.

advertisement

सेमीफायनल 1 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (4 मार्च, कोलकाता)

ऑन-फिल्ड अंपायर : रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ

थर्ड अंपायर : नितीन मेनन

फोर्थ अंपायर : रॉड टकर

मॅच रेफरी : जवागल श्रीनाथ

सेमीफायनल 2 : भारत विरुद्ध इंग्लंड (5 मार्च, मुंबई)

ऑन-फिल्ड अंपायर : ख्रिस गॅफनी आणि अल्लाहुद्दीन पालेकर.

advertisement

थर्ड अंपायर : एड्रियन होल्डस्टॉक

फोर्थ अंपायर : पॉल रायफल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा तर तेजीतच, आल्याला आणि लिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मॅच रेफरी : अँडी पायक्रॉफ्ट

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलचे अंपायर ठरले, टीम इंडियासाठी 'अनलकी' मैदानात उतरणार का नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल