अभिषेक शर्मासाठी सेमी फायनलचा दिवस नवीन पान आहे. तो या संधीचा फायदा नक्की घेईल, असा विश्वास टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कल याने व्यक्त केला आहे.
मॉर्ने मॉर्कल याने अभिषेक शर्माच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीची आठवण देखील करून दिली. याआधी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावलं होतं. या मॅचपासून अभिषेकने प्रेरणा घेतली पाहिजे, असं मॉर्कल म्हणाला आहे. तसंच मॉर्कलने अभिषेकला निर्भयपणे खेळण्याचा सल्ला दिला आहे. अभिषेकच्या बॅटिंग टेकनिकमध्ये कोणतेही दोष नाहीत, अभिषेकच्या बॅटमधून दोन चांगले शॉट लागले तर तो फॉर्ममध्ये येईल, असा विश्वास मॉर्कलने व्यक्त केला आहे.
advertisement
दरम्यान मॉर्ने मॉर्केलने संजू सॅमसनचेही कौतुक केले. 'संजूने एका महत्त्वाच्या सामन्यात त्याचा अनुभव आणि दर्जा दाखवला. संधी मिळताच स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी तयार राहायला पाहिजे, संजूने ते करून दाखवलं, अशी प्रतिक्रिया मॉर्कलने दिली आहे.
वानखेडेवर होणार मोठा स्कोअर
वानखेडेची खेळपट्टी पाहून मॉर्कलने सेमी फायनलमध्ये मोठा स्कोअर होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. उष्णतेमुळे अचूक अंदाज बांधणं अवघड आहे, पण मोठ्या स्कोअरसाठी आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मॉर्कलने दिली.
फिल्डिंग सुधारण्याची गरज
मॉर्केलने टीमच्या फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची कबुलीही दिली. 'आम्ही मैदानावर 15 ते 20 जास्त रन देत आहोत. खेळाडूंना या क्षेत्रात अतिरिक्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे, असं मॉर्कल म्हणाला.
