फिन ऍलनने फक्त 33 बॉलमध्ये 303.03 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 रनची ऐतिहासिक खेळी केली. फिन ऍलनच्या या तुफानी शतकामध्ये 8 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातलं हे सगळ्यात जलद शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधलं हे तिसरं सगळ्यात जलद शतक आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 170 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने पहिल्या ओव्हरपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
advertisement
फिन ऍलनचे विक्रम
टी-20 वर्ल्ड कपमधलं सगळ्यात जलद शतक
टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यांमधला सर्वाधिक स्कोअर
टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात एका खेळाडूच्या सर्वाधिक सिक्स (8)
संपूर्ण इनिंगमध्ये फक्त 4 डॉट
न्यूझीलंडचे ओपनर फिन ऍलन आणि टीम सायफर्ट यांच्यात 9.1 ओव्हरमध्येच 117 रनची पार्टनरशीप झाली. टीम सायफर्टने 33 बॉलमध्ये 175.76 च्या स्ट्राईक रेटने 58 रन केले, ज्यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. या विजयासोबतच आता न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल. 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 169/8 वर रोखलं. दक्षिण आफ्रिकेकडून सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्को यानसनने अर्धशतक केलं. यानसनने 30 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, कोले मॅककॉनचिए आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर लॉकी फर्ग्युसन आणि जिमी निशम यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
