शुभमन प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट?
अंतिम इलेव्हनमध्ये शुभमन, अभिषेक, यशस्वी आणि संजू यांचे एकाच वेळी संघात असणं अशक्य आहे. तसेच, माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यावर आणि आयपीएल 2025 मध्ये शानदार फॉर्म दाखवल्यानंतर गिल पुन्हा एकदा टी-20 संघात प्रवेश करेल. मात्र, शुभमन गिलला नेहमीप्रमाणे प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट करणं अवघड काम असेल.
तिलक वर्माचं स्थान धोक्यात
advertisement
शुभमन गिल टॉप 3 मध्ये कुठलाही एक स्थान घेऊ शकतो, मग तो सलामीवीर असेल किंवा विराट कोहलीचा जुन्या क्रमांक-3 स्थानावर देखील तो खेळू शकतो. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू तिलक वर्मा याचं स्थान धोक्यात आलं आहे. तिलक वर्माला स्कॉडमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुभमनला उपकर्णधारपद मिळणार?
तसेच शुभमन गिलला उपकर्णधारपदही पुन्हा दिले जाऊ शकते, कारण तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व देखील करतोय. स्पष्टपणे व्यवस्थापन त्याला या प्रकारातही नेतृत्व म्हणून पाहत आहे. तसेच, यशस्वी जायस्याल संघात राखीव सलामीवीर म्हणून सहभागी होऊ शकतो. अशा परिस्थितीत सूर्यकुमार नंबर-४ ला उतरावं लागणार आहे.
टीम इंडियाचा संभाव्य स्कॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.