प्रग्यान ओझाचं क्रिकेट करिअर
डावखुरा स्पिनर असलेला प्रग्यान ओझा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. 2006-07 च्या रणजी ट्रॉफीच्या मोसमात ओझाने 29 विकेट घेतल्या आणि निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं, यानंतर इंडिया ए कडूनही ओझाने उत्कृष्ट कामगिरी केली. 2008 साली बांगलादेशविरुद्धच्या वनडेमधून ओझाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. तर श्रीलंकेविरुद्ध ओझा त्याची पहिली टेस्ट खेळला.
advertisement
सचिनच्या रिटायरमेंटसोबतच ओझाचं करिअरही संपलं
प्रग्यान ओझाने त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच वेस्ट इंडिजविरुद्ध 2013 साली खेळली. या सामन्यात ओझाने 10 विकेट घेतल्या, त्यामुळे भारताचा इनिंग आणि 126 रननी विजय झाला. हा सामना सचि तेंडुलकरच्या करिअरमधला शेवटचा सामना होता. सचिनच्या शेवटच्या टेस्टमध्ये प्रग्यान ओझाने केलेली ही कामगिरी झाकोळली गेली आणि ओझासाठीही हा सामना शेवटचा ठरला. डावखुरा स्पिनर असलेल्या प्रग्यान ओझाने 24 टेस्टमध्ये 113 विकेट घेतल्या, ज्यात त्याने 7 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 19 वनडेमध्ये 21 विकेट आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 विकेटही मिळवल्या.
आरपी सिंगचं करिअर
दुसरीकडे आरपी सिंग याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दही धमाक्याने सुरू झाली, पण काही काळामध्येच तो टीममधून बाहेर झाला. उत्तर प्रदेशच्या या डावखुऱ्या फास्ट बॉलरने 2004 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली. यानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 34 विकेट घेऊन टीम इंडियामध्ये प्रवेश केला. सप्टेंबर 2005 साली आरपी सिंगने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर 2007 च्या लॉर्ड्स टेस्टमध्ये आरपी सिंगने इंग्लंडविरुद्ध 5 विकेट घेतल्या. तसंच भारताने 2007 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या टीममध्येही आरपी सिंग होता. 2008 च्या पर्थ टेस्टमध्ये 6 विकेट घेऊन त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.