सेमीफायनलची जागा अजूनही धोक्यात
दोन मॅचमध्ये दोन विजय मिळवून भारत ग्रुपमध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांनी पाकिस्तान आणि ओमान या दोन्ही टीम्सचा पराभव केला. पाकिस्तानने एका मॅचमध्ये विजय मिळवला असून एका मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचा निव्वळ रनरेट चांगला आहे, पण त्यांची उपांत्य फेरीतील जागा अजूनही धोक्यात आहे. यूएईने ओमानला हरवून स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला आहे. त्यामुळे, त्यांचेही Super 4 मध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम आहे.
advertisement
Super 4 साठी कोण पात्र?
पाकिस्तानला आता त्यांचा पुढील सामना यूएईविरुद्ध खेळायचा आहे. ही मॅच त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' अशी असणार आहे. जी टीम ही मॅच जिंकेल, ती भारतासोबत ग्रुप 'ए' मधून Super 4 साठी पात्र ठरेल. हरणाऱ्या टीमचे आव्हान संपुष्टात येईल. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्धच्या या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांचे लक्ष पुढील मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यावर असेल.
दरम्यान, दुसरीकडे ग्रुप बी मधील समीकरण अधिक रोमांचक झालं आहे. श्रीलंकेने खेळलेले दोन्ही सामने जिंकले असून श्रीलंकेला आता अफगाणिस्तानचं कडवट आव्हान पार करायचं आहे. अफगाणिस्तानने एकच सामना खेळला असून अफगाणिस्तानसाठी सेमीफायनलचा रस्ता स्पष्ट होताना दिसत आहे. तर श्रीलंकेला देखील क्वालिफाय करण्यासाठी अफगाणिस्तानच्या एका विजयाची गरज आहे.